धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती, जिल्हा नियोजन समितीची बैठक, दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा तसेच आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, सकाळी 7.30 वाजता पालकमंत्री सरनाईक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहातून मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील. सकाळी 8.35 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे आगमन होऊन तेथे राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी 8.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिन समारंभास ते उपस्थित राहतील.
सकाळी 10 ते 11 या वेळेत नियोजन भवन येथे धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईबाबत आढावा बैठक होईल. दुपारी 12 ते 12.30 या वेळेत शारदीय नवरात्रोत्सव बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.











