धाराशिव – समय सारथी
प्रेम प्रकरणाच्या संशयातून तुळजापूर शहरात 2 तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समोर आली आहे. या मारहाणीत समीर जब्बार पटेल याचा मृत्यू झाला असून अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
अरबाज सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसला असताना तिघांनी त्याला बळजबरीने वाहनात बसवून शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड घेऊन मोबाईलची तपासणी करण्यात आली. मोबाईलमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नसतानाही त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली असे जखमी तरुणाचे म्हणणे आहे.
अरबाजच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेत, ‘तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस,’ असा आरोप करत तब्बल 2 तास त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर समीर पटेल याला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तेथे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्यालाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अरबाज यालाही मृत समजून तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून टाकण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.











