धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवावे अश्या मागणीचे निवेदन ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. संगनमत करून बोगस कागदपत्रे तयार करून मशीद व पीरच्या जागेचे क्षेत्र वाढविण्यात आले असल्याचा आरोप असुन या बांधकामामुळे सार्वजनिक रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. मशीदीच्या जागेच्या नावाखाली हा प्रकार सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पारगाव येथील सिटी सर्वे नंबर 633 मध्ये 68 चौ मी जागा ही मशीद व 638 मध्ये 9 चौ मी जागा पीर दर्गा असुन तत्कालीन ग्रामसेवक व इतरांना हाताशी धरून संगणमत करून सदर जागेचे क्षेत्र वाढवुन घेतले आहे. सुरुवातीला 1 हजार 681 चौ फुट व नंतर 2 हजार 702 चौ फुट असे बदल करण्यात आले आहेत. वकफ बोर्डास चुकीची माहिती देऊन अधिकार नसतानाही हा प्रकार करण्यात आला.
सरकारी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने गावकऱ्याना ये जा करण्यासाठी, शेतीचा माल, जनावरे नेहण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. अनेक वेळा तोंडी व तक्रार करूनही बांधकाम सुरूच आहे. ग्रामसेवक यांनी 9 ऑक्टोबर 26 रोजी मशीद बांधकाम थांबवावे यासाठी नोटीस दिली तरीही काम सुरूच आहे. गावकऱ्यांनी निवेदनासोबत 8 अ, वकफ बोर्ड आदेश व इतर कागदोपत्री पुरावे व रस्त्याचे फोटो दिले असुन बांधकाम तात्काळ थांबवून खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
26 फुटांचा सार्वजनिक रस्ता 8 फुटाचा झालेला आहे एवढे अतिक्रमण सार्वजनिक रस्त्यावर झालेले आहे तरी देखील याकडे डोळेझाक केली जात आहे. ग्रामस्थ सामूहिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असुन प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे.












