तुळजापूर – समय सारथी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असुन तुळजापूर येथे महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील व समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकारी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करुन विजयी झाले होते, ते दुसऱ्यांदा तुळजापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवीत आहेत तर पाटील हे पहिल्यादा निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात शहरी भागात 45, ग्रामीण भागात 365 असे 410 मतदान केंद्र असुन 14 टेबलवर मतमोजणीचे 30 राऊंड होतील तर पोस्टल मतमोजणीचे 4 राऊंड होतील. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर येथून राणाजगजीतसिंह पाटील हे 23 हजार 169 मतांनी विजयी झाले होते त्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना 99 हजार 034 मते पडली होती. 2024 विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 2 लाख 56 हजार 569 इतके मतदान झाले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 83 हजार 077 मतदारापैकी 2 लाख 56 हजार 569 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 1 लाख 20 हजार 576 महिला तर 1 लाख 35 हजार 991 पुरुषांनी मतदान केले, महिलांची टक्केवारी 66.23 तर पुरुषांचे 67.64टक्के मतदान झाले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद कळंब व भुम परंडा विधानसभा मतदार संघासाठी 1 हजार 523 मतदान केंद्रावर 20 नोव्हेंबरला मतदान झाले आहे, त्याची मतमोजणी सुरु आहे.