धाराशिव – समय सारथी
शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परभणीचे आमदार राहुल पाटील बैठकीला गैरहजर होते, विधानसभातील 19 व विधान परिषदेतील 5 आमदार हजर होते. घरी कार्यक्रम असल्याने येऊ शकलो नाही असे कारण पाटील यांनी दिले असुन तसे ठाकरेंना कळविले असल्याचे टे म्हणाले. यापूर्वी देखील त्यांनी वारीचे कारण देत गैरहजर राहिले.
सत्तेचा गैरवापर, जनविरोधी निर्णय आणि महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करणाऱ्या प्रवृत्तींना रस्त्यावर आणि विधानसभेत ठामपणे लढा देत जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आमदार कैलास पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या अस्मितेवर होणारे आघात, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असे आमदार पाटील म्हणाले.












