Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

समय सारथी by समय सारथी
August 27, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.4k
VIEWS

स्वतःचे काही नगरसेवक विकत घेण्याची वेळ – सत्ता, लिलाव, बोली अन बाजार

धाराशिव – समय सारथी

शिवसेना उबाठा गटातील 4 नगरसेवक पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजप, पर्यायाने राजेनिंबाळकर आणि पाटील हा पारंपरिक वाद अधिक तीव्र झाला आहे. धाराशिव शहरातील समता नगर भागातील उबाठा गटाचे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक नाना घाडगे हे शिंदे गटात गेल्यानंतर भाजपने त्या प्रभागात बॅनर लावले आहेत. भाजप नगरसेवक सुजित साळुंके यांनी हे बॅनर लावुन भावना व्यक्त केल्या आहेत.

1 कोटींचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही. 1 खोका मतदाराला दिला धोका, क्लीन समताचा दाढीवाला बोका.. आमचं मत आम्हाला परत द्या.. सोसायटी लुटली, तिजोरी फोडली, 1 कोटी घेऊन निष्ठा विकली.. अश्या स्वरूपाचा आशय असलेले हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजी नंतर वाद पेटला आहे.

एरव्ही संथ गतीने काम करणाऱ्या नगर परिषदेने हे बॅनर हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. राजकीय नेत्यांच्या फोनाफोनी नंतर नगर परिषद आता हे बॅनर सन्मानाने उतरवीत आहे. 2029 ची लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आणि विकास निधीतील वाटा यातून इतर पक्षाचे सदस्य फोडाफोडी करताना भाजपचे जुने शिलेदार मात्र नाराज होत असल्याचे वास्तव आहे. नवीन आलेल्याना मान, दाम व खुर्ची.. ते तुपाशी अन आम्ही मात्र उपाशी अशी भावना व प्रतिक्रिया धाराशिव, तुळजापूर येथे व्यक्त होत आहे.

धाराशिव नगर परिषदेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक फोडण्याची खेळी केली होती मात्र ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली. भाजपकडे 5 नगरसेवक जाणार होते याची जबाबदारी काही जणांवर दिली होती मात्र यंत्रणा फुसकी व अकार्यक्षम ठरल्याने तोंडावर पडले. हेच नगरसेवक भाजपमध्ये आले असते तर त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्याची वेळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली असती. कळंब नगर परिषदेत जे केले त्याला काय म्हणायचे याचे उत्तर भाजप नेतृत्वाकडे नाही. यश आल्यावर चाणक्यनिती असा ‘उदोउदो’ तर पराभवाचे ‘खापर’ कोणावर फोडणार व श्रेय कोण घेणार ? अशी चर्चा आहे.

5 पैकी 4 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात घेण्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांना यश आले. 4 पैकी काही नगरसेवक यांनी उपद्रव मूल्य दाखवीत दरपत्रक वाढवीत घोडेबाजार केला. स्वतः पक्ष तिकीट देऊन, जीवाचे रान करून प्रचार करीत निवडून आणलेले काही नगरसेवक ‘लक्ष्मी दर्शन’ करून सत्तेच्या लिलावात ‘विकत’ घेण्याची वेळ खासदार ओमराजे यांच्यावर आली. तोंड दाबून बुक्यांचा मार सध्या ओमराजे सहन करीत असुन काहींचे ‘लाड’ पुरवीत आहेत.

Previous Post

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

Next Post

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

Related Posts

महाराष्ट्र

तुळजापूर येथील हत्याकांड प्रकरणात महंत शिंदे महाराज यांना दिलासा – छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर

November 27, 2026
महाराष्ट्र

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026
महाराष्ट्र

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
महाराष्ट्र

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
महाराष्ट्र

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

November 8, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026
Next Post

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद - भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

तुळजापूर येथील हत्याकांड प्रकरणात महंत शिंदे महाराज यांना दिलासा – छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर

November 27, 2026

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp