धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील हत्याकांड प्रकरणात महंत शिंदे महाराज यांना दिलासा मिळाला असुन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. शिंदे महाराज यांना धाराशिव येथील कोर्टाने जामीन देत दिलासा दिला होता त्यानंतर जामीन रद्द केला मात्र उच्च न्यायालयात जाण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार महाराज यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता, तो कोर्टाने मंजुर करीत दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे महाराज यांच्या समर्थकाना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी होणार असुन तो पर्यंत जामीन मंजुर केला आहे. ज्येष्ठ ऍड प्रमोद मुळे यांनी महाराज यांची सक्षमपणे बाजु मांडली.











