धाराशिव – समय सारथी
एकीकडे धाराशिव नगर परिषदेत शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक फोडण्याचा व पक्षप्रवेशाचा घटनाक्रम सुरु असताना गटनेते राजाभाऊ पवार यांनी ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील, मनोगत शिनगारे हे उपस्थितीत होते. 4 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात गेले असताना पवार हे येतील असे वाटतं असताना ते भाजपच्या वाटेवर असल्याचे या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. गटनेते म्हणुन पवार हे भाजपच्या माध्यमातून कोणती कायदेशीर खेळी खेळणार हे पाहावे लागेल.











