धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील शिवसेना उबाठा गटाच्या 4 नगरसेवकांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यात आला. नगरसेवक प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे व केसरबाई ज्ञानदेव करवर या 4 नगरसेवक यांनी प्रवेश केला. यावेळी डॉ जय राजे, सहसंपर्कप्रमुख सुरज महाराज साळुंके, ऋषी मगर, सोमनाथ गुरव, अमित उंबरे,सह्यादी राजेनिंबाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहण्याचा शिवसेनेचा विचार पुढे नेत धाराशिव शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या सहकाऱ्यांच्या सहभागाचा निश्चितच मोठा हातभार लागेल असा विश्वास खासदार ओमराजे यांनी व्यक्त केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस खासदार ओमराजे यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना उबाठा गटाचे हे नगरसेवक आता महायुतीतील शिंदे गटात जाऊन सत्तेत व विकासाच्या गंगेत सहभागी झाले आहेत. ऑपरेशन लोटस राबविले जात असताना अनेक नाट्यमय घडामोडी, मनधरणी व घोडेबाजारीनंतर ऑपरेशन ‘टायगर’ यशस्वी झाले.











