17 वर्ष कोण परत करणार – योग्य वेळी पोलखोल करेन – आमदार राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे व त्यांचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल कोर्टाने दिले त्यानंतर डॉ पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अनेक गौप्यस्फ़ोट केले. यावेळी डॉ पाटील यांचे नातु मल्हार व मेघ पाटील, सतीश दंडनाईक, नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थितीत होते. कै पवनराजे व समद काझी यांची दुर्दैवी हत्या झाली त्याला 20 वर्ष आली, गेली 17 वर्षापासून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. न्याय देवेतेवर आमचा सुरुवाती पासूनच आमचा विश्वास होता, आम्हाला 17 वर्षांनी न्याय मिळाला याचा आंनद आहे. मात्र या लोकांचे 17 वर्ष कोण परत करणार आहे. डॉ पाटील यांची परिस्थितीती पहिली तर त्यांना गेली 17 वर्ष हे सगळं सहन करावे लागले. या विषयाशी काही संबंध नसताना राजकीय षडयंत्र रचण्यात आले, टप्या टप्याने काही गोष्टी समोर येतील.
डॉ पाटील यांना काय झाले आहे हे मी समजावून सांगू शकत नाही आणि त्यांना ते कळणार सुद्धा नाही अशी त्यांची वैद्यकीय स्तिथी आहे. ही स्तिथी कशामुळे उद्भवली, हे षडयंत्र कोण व का केले, यात कोण कोण प्यादे होते. 1990 च्या दरम्यान डॉ पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते तसा त्यांना शब्द दिला होता मात्र ते काही कारणाने होऊ शकले नाहीत. खासदार म्हणुन निवडून आल्यावर कॅबिनेटचा विस्तार होणार होता त्याच काळात हे षडयंत्र रचले गेले, ते बऱ्यापैकी समोर आले आहे.
षडयंत्रकारी कोण याबाबत नंतर बोलेन, अनेक लोकांनी चुकीची विधाने केली. न्याय प्रविष्ट असल्याने मी काही बोलत नव्हतो, राजकीय फायदा घेतला गेला. अतिशय चुकीची धाधंत विधाने केली जात होती. योग्य वेळी गरजेनुसार याबाबत बोलेन असे आमदार पाटील म्हणाले. या खटल्याला 17 वर्ष का लागले? कोणी उशीर केला हे आज ना उद्या नक्की सांगेल.
धाराशिवच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणातुन डॉ पाटील यांना अडकवले, याबाबत अभ्यास करा, योग्य वेळी मी नक्की बोलेन. पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली, त्याची कारणे काय होती, ही आमची मागणी असणार आहे. अनेक बाबी कोर्टाच्या समोर आल्या असुन या प्रकरणाचा योग्य तपास झाला तर खरे आरोपी कोण आहेत हे आजही निदर्शनास येऊ शकते असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. नेमकं हे कोणी केले याचा तपास करून हे समोर आले पाहिजे.
2006 साली दुर्दैवी हत्या झाल्यावर दुसऱ्या महिन्यापासून राजकारण केले गेले, या दुर्दैवी घटनेचा वापर राजकारणासाठी करण्यात आला. कोणाच्या सांगण्यावरून केले गेले परंतु काही जन सांगण्याला बळी पडले, दुर्दैवी घटनेचा पुरेपूर राजकीय वापर झाला असे ते म्हणाले. उच्च न्यायालयात कोणी गेले तर आम्ही आमची बाजु सक्षमपणे मांडू असे ते म्हणाले. राकेश मारिया यांच्या बाबतीत निकाल वाचून बोलेन.
षडयंत्र कोणी, कधी, कसं व कशासाठी रचले याची बऱ्यापैकी माहिती मला आहे मात्र ते कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून दयायचे हे मी ठरवेल. कोर्टाचा आदेश वाचल्यावर याबाबत सविस्तर बोलेन असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. या काळात ज्यांनी साथ दिले त्यांचे आभार मानले. आई तुळजाभवानी व संत गोरोबा काका यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने हे झाले.











