धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा निकाल लागला असुन यात डॉ पाटील यांच्यासह सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. निकाल व राजकीय भुमिका याचा काही संबंध नाही, मतदार संघात जाऊन लोकांशी चर्चा करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर निंबाळकर म्हणाले. हत्याकांड निकाल महत्वाचा असला तरी राजकीय भुमिका वेगळी आहे असे म्हणत निर्णयावर ठाम असल्याचे सांगत पक्ष बदलणार असल्याचे सुचक संकेत दिले.
मागील 20 वर्षांपासून आरोपीना शिक्षा व्हावी यासाठी मी व तपास यंत्रणा प्रयत्न करीत होतो मात्र दुर्दैवाने निकाल विरोधात लागला, या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असुन तिथे न्यायाची अपेक्षा आहे. कोर्टाने निकालावर बोलण्यापेक्षा अपील करून निकालातील मुद्दे उच्च न्यायायात पटवून द्यावा लागेल, आपल्या न्याय व्यवस्थेत कोर्टाने दिलेला निकाल स्वीकारावा लागेल. शेवटच्या कोर्टापर्यत जे जे काही कायदेशीर पर्याय असतील त्याचा वापर करीत लढणार असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. ट्रायल कोर्टाने काय अर्थ लावला याचा विचार उच्च न्यायालय करेल, हा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे. संविधान व न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असेही ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला तपास केला त्यांच्यावर प्रचंड दबाव होता त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात कोर्टात गेलो व सीबीआयकडे वर्ग करण्यात आला, त्याच्यावरही प्रचंड दबाव होता. सुरुवातीच्या तपास यंत्रणा मॅनेज असल्याची वस्तुस्तिथी होती त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो.
कलयुग आहे, कलयुगात वाईट गोष्टीना बळ मिळते, चांगल्या गोष्टींना यश मिळत नाही.मी मतदार संघात जाऊन सगळ्यांची चर्चा करून राजकीय भूमिकेबाबत निर्णय घेणार आहे. केसचा निकाल माझ्यासाठी खुप महत्वाचा होता कारण 20 वर्ष शिक्षेसाठी लढा देत होतो व वाट पाहत होतो. माझ्या पक्ष बदलाच, राजकीय भूमिकेचा व निकालाचा काही संबंध नाही. राजकीय निर्णयाचा भाग वेगळा आहे, कार्यकर्ते व लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ओमराजे म्हणाले.











