जैनच्या रंगीत कथा, तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह – ठोस पुरावा नाही – कोर्टाचा निकाल
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणात कोर्टाने निकाल जाहीर केला असुन डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीची कोर्टाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर नावंदर यांनी हा निकाल दिला. पवन राजे यांना कोण व का मारले हा प्रश्न मात्र 20 वर्षानंतर अनुत्तारित राहिले. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का असुन ते काय राजकीय भुमिका घेतात हे पाहावे लागेल.
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार सर्व आरोपी कोर्टात हजर झाले होते, महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा उशिराने कोर्टात आल्याने सुनावणीला काही काळ विलंब झाला. निकालासाठी डॉ पाटील यांचे दोन्ही पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, नातू मल्हार व मेघ पाटील उपस्थितीत होते. पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर होते.
मागील वेळी 16 जुनला निकाल देऊ न शकल्याने न्यायाधीश यांनी दिलगिरी व्यक्त केली. आरोपी व सरकार पक्ष, फिर्यादी या दोन्ही बाजूच्या वकिलांचे न्यायाधीश यांनी आभार मानले. सीबीआयने चांगला तपास केला त्याबद्दल आभार मानले. 127 साक्षीदार तपासले गेले. सुरुवातीला तपास कळंबोली पोलिसांनी केला त्यानंतर सीबीआयने तपास केला असे मृत्युचं कारण हेतु तपासण्यासाठी बहुतांश साक्षीदार तपासण्यात आले.
पारसमल जैन या माफीच्या साक्षीदार याच्यावर आधारित हा संपुर्ण खटला असुन त्यांच्यात संदीगधता आहे त्यामुळे इतर पुरावे यांचा सुद्धा उहापोह केला. मारहाणीनंतर तो माफीचा साक्षीदार बनला. जबाब नोंद करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली नाही. तपास यंत्रणा व त्यांच्या तपासाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. माफीचा साक्षीदाराचा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता व दुसरा जबाब सारखा नाही, तो बदलला आहे त्यामुळे तो ग्राह्य धरला जाणार नाही असे कोर्ट म्हणाले. तो नोंदविताना काळजी घ्यायला हवी होती.
डॉ पद्मसिंह पाटील व पवनराजे यांच्यात धुसफूस असल्याचे व राजकीय वैर असल्याचे समोर आल्याचे कोर्ट म्हणाले. 2002 नंतर ते कट्टर राजकीय विरोधक बनले होते, त्यांच्यात धुसफूस होती. पारसमल जैन याला इतर आरोपी बाबत इर्षा होती, त्यातून तो माफीचा साक्षीदार बनला. मला डांबले आहे व इतर आरोपी बाहेर फिरतात. त्याचे इनकाउंटर करण्याची धमकी दिली असल्याचा अर्ज त्याने दिला होता. तो सतत जबाब बदलतो त्यामुळे तो विश्वासहार्य नाही व ग्राह्य धरता येणार नाही, त्यात विसंगती आहे.
जैन याची आर्थिक स्तिथी जंगम मालमत्ता चांगली आहे त्यामुळे 50 हजार रुपयांसाठी तो असे काही करेल असे वाटत नाही. प्रकरणाच्या तपासामुळे पाया ठिसूळ झाला आहे. जैनचा मोबाईल फोन जप्त केला नाही, सीडीआर घेतला नाही, घरझाडतीत त्याच्या घराचा शोध घेतला असता काही सापडले नाही. जैन याच्या सांगण्याला काही आधार नाही, त्याने वेगवेगळ्या कथा सांगितल्या मात्र त्याचा पुरावा दिला नाही. माफीच्या साक्षी जबाबावर जैन याने सही केली नाही.
इंद्रप्रस्थ रेस्ट हाऊस येथे थांबल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याने पैसे कोणाकडे दिले याबाबत वेगवेगळे जबाब देत आहे त्यामुळे संदिघता निर्माण झाली, तो जबाब देताना याने चुकलो व विसरलो असे म्हणाला नाही त्यामुळे त्याने खरा जबाब दिला. राकेश मारिया यामुळे त्याने कबुली जबाब दिला, राकेश मारिया यांना अधिक प्रश्न का विचारले नाहीत. जैन हा बिहारला गेला याचे प्रवास ट्रेन, तिकीट व इतर प्रवासाचे पुरावे पोलिसांनी दिले नाहीत.
डॉ पाटील यांचा मलबार हिल येथे बंगला असल्याची साक्ष जैन याने दिली मात्र त्याचे कोणतेही रेकॉर्ड सरकारी पक्षाकडे नाही. माफीच्या साक्षीदारावर सरकारी पक्ष अवलंबून होता, काही पुरावे नंतर पेरण्यात आल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. जैन हा मारिया यांना भेटला असे तो म्हणाला मात्र मारिया यांनी नाकारले. सिवानवरून शस्त्र आणली त्याचे पुरावे नाहीत, त्यातील हरी कृष्ण यादव नावाचा साक्षीदार खोट बोलत आहे. 85 हजारात गाडी घेतली असे सांगतो मात्र 1 लाख 5 हजाराला घेतली असे नंतर म्हणतो म्हणुन त्याला खोटे बोलण्याची सवय आहे असे दिसते.
हत्या झाली त्यावेळी तीच गाडी होती का याबाबत प्रश्न उपस्थितीत केला. आरोपीची गाडी जप्त केली त्यावेळी ती जळाली होती त्यात रंग हिरवा असे नमुद केले, जाळलेल्या गाडीचा रंग कसा कळाला. आरोपीचे संभाषण ज्या पीसीयु टेलीफोन बूथवरून झाले त्याचा सीडीआर पुरावा कोर्टासमोर सिद्ध झाला नाही. घडलेल्या घटनेचा तपशील जैन याने विस्तृतपणे सांगितला मात्र त्याचे रीक्रियेशन सिन करण्यात आले नाही. जैन याचे जे पत्र होते, ते कोण दिले हे नमुद नाही.
पवनराजे यांची गाडी कुठल्या बाजुला उभी होती, याचे लोकेशन बाबत वेगवेगळी माहिती समोर आल्याने संशय आहे. गाडी पंचनाम्यात डाव्या बाजुला होती असे होते तर जबाबात उजव्या बाजुला उभी असे म्हण्टले. मुंबई बाहेर जाण्याच्या 4 वेगवेगळ्या कथा सांगितल्या. जैन शुटरला उत्तर प्रदेशात भेटला त्याने 20 लाखातील अडीच लाख दिले तर काही 7 लाख दिले असे सांगतो.
डॉ पद्मसिंह पाटील,सतीश मंदाडे,मोहन शुक्ला,पारसमल जैन बादला ( माफीचा साक्षीदार ) दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी, कैलास यादव, ग्यानेंद्र छोटे पांडे शशिकांत कुलकर्णी हे IPC कलम 302, 120 ब व आर्म ऍक्ट 3,25 and 27 च्या आरोपातुन मुक्त झाले आहेत.












