धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 20 जुन रोजी लागणार आहे. हत्याकांड निकालात आरोपीच्या आयुष्याचा फैसला होणार असुन धाराशिव जिल्ह्याचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. गेली 2 दशकापासुन कै पवनराजे हत्याकांड राजकारणाचा केंद्र बिंदु राहिले आहे, आता निकालाच्या वेळी सुद्धा तशीच स्तिथी निर्माण झाली आहे.
कै पवनराजे याचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर हे निकालानंतर राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहेत, ऑपरेशन टायगरचा ते एक भाग असुन ते शिवसेना उबाठा गट सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे निश्चित आहे मात्र 20 जुनला निकाल लागल्यास ते भुमिका जाहीर करतील.
वडिलांचा खुन करून पोरक केल, चुलत भावाची हत्या, नात्याला काळिमा, ज्या राजकीय कारणासाठी हत्या झाली त्यांचे राजकारण या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, वितुष्ट संपणार नाही असे ओमराजे नेहमी सांगतात, हाच त्यांचा मुद्दा राहिला असुन त्यावर लोकांचे भावनिक पाठबळ आहे. निकाल ओमराजे यांच्या विरोधात गेल्यास त्यांच्या पक्षांतर विषयाला ‘खो’ बसून शकतो, ऑपरेशन टायगरचे भवितव्य ओमराजे यांच्या भुमिकेवर ठरणार आहे. एकीकडे शिवसेनेशी ‘गद्दारी’ चा ठपका व त्यातच निकाल विरोधात गेल्यावरही पक्ष प्रवेश केला तर मोठे नुकसान होणार आहे. मांडीला मांडी लावुन बसलात यासह अन्य टिकेचे डॅमेज कंट्रोल करणे अवघड असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
तर दुसरीकडे डॉ पद्मसिंह पाटील हे मुख्य आरोपी असुन ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वडील आहेत. त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतर केले त्यातील हे एक कारण असल्याचे बोलले जाते. या निकालावर डॉ पाटील परिवाराचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 1 हत्याकांड 2 पक्ष प्रवेश व राजकीय भवितव्य अशीच स्थिती आहे. एक पुत्र वडिलांच्या रक्षणासाठी तर दुसरा न्याय देण्यासाठी अशी प्रतिक्रिया उमटत असुन काय होणार याकडे लक्ष लागले आहे.












