धाराशिव – समय सारथी
आम्ही अखंड जपला महाराष्ट्रहिताचा वसा असे म्हणत,
तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठा सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांच्या सोबत कोण कोण जाते याकडे लक्ष लागले असतानाच नंदू राजे यांनी सुचक कौल देत एक प्रकारे सध्याची भुमिका स्पष्ट केली. ते शिवसेना उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख असुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे.












