Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

धाराशिव मेडिकल कॉलेज इमारत टेंडरमध्ये घोटाळा – आमदार कैलास पाटीलांनी केली पोलखोल, अधिवेशनात आवाज

समय सारथी by समय सारथी
June 30, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या ( एमएसआयडीसी ) कारभाराची आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात पोलखोल करीत गंभीर आरोप केले. धाराशिव येथील मेडिकल कॉलेज इमारतीच्या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला, कागदपत्रे मागवूनही ती खोटी दिली जातात. बार्शी ते धाराशिव हा रस्ता 10 मीटरचा तर धाराशिव बोरफळ औसा हा रस्ता 7 मीटरचा केला आहे, असा प्रकल्प बनवतात. 

रस्त्याची अनेक कामे मंजुर असतानाही ती अपूर्ण आहेत. रोज अपघात होत असुन लोकांचे मृत्यू होत आहेत, लोक आंदोलन करीत आहेत. 43 हजार कोटींची मंजुरी देण्यात आली मात्र प्रत्यक्षात 3 हजार कोटी मिळाले. बील मिळत नसल्याने कामे होत नसल्याचे ठेकेदार सांगतो, त्याला डाबराचे भाव वाढल्याने व इतर कारणाने मुदतवाढ दिली जाते. अशी स्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ( एमएसआयडीसी ) कारभार अजब आहे. 

व्यवस्थापकीय संचालक हे दीक्षित नावाचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. सेवानिवृत्त अधिकारी यांना इथे का बसवले तर फक्त टेंडर मॅनेज करून द्यायचे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे तत्व असते मात्र या विभागात जास्त टक्केवारी देणाऱ्यास प्राधान्य हे आहे. ठेकेदार याची कागदपत्रे खरी आहेत की खोटी यासह कोणत्याही कागदपत्राची पाहणी तपासणी केली जात नाही फक्त टक्केवारी हा निकष आहे. 

धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम हाती घेण्यात आले. या महामंडळाकडे ठराविक कर्मचारी आहेत, फक्त टेंडर मॅनेज करण्या इतपत माणसे आहेत. धाराशिव येथे ठेकेदार बोगस कागदपत्रे आधारे ग्राह्य धरला गेला, कदाचित जास्त टक्केवारी दिली असल्याने त्याला प्राधान्य दिले असावे. मी याबाबत माहिती मागवली मात्र ती अधिकाऱ्यांनी खोटी दिली गेली. 

1 लाख कोटींची कामे असुन प्रकल्प अहवाल तयार करायला खासगी माणसे, कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रयस्थ बाहेरील यंत्रणा या खात्यातील माणसांना काहीच काम राहत नाही. प्रकल्प अहवालाचे त्यांनी धाराशिव येथील उदाहरण दिले, बार्शी ते धाराशिव हा रस्ता 10 मीटरचा तर धाराशिव बोरफळ औसा हा रस्ता 7 मीटरचा केला आहे. लहान मोठा रस्ता केला, तो पण अर्धवट. धाराशिव शहरातून रस्ता जातो त्याला नाली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाऊस झाला की सगळे पाणी लोकांच्या दुकानात व घरात जाते. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना उद्देशून ते म्हणाले की, राजे आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहेत, तुमच्याकडुन काही अपेक्षा आहेत. शिवाजी महाराज यांनी भ्रष्टाचाऱ्याच्या कडेलोट केला. संभाजी महाराज यांनी तर हत्तीच्या पायाखाली दिले. आजच्या स्तिथीत ठेकेदार यांची बिले द्यायला पैसे नाहीत, काही ठेकेदार आत्महत्या करीत आहेत दुसरीकडे एमएसआयडीसीने एक अजब अट टाकली आहे. निविदा रकमेपेक्षा कमी दराने बिलो टेंडर भरले तर 7.5 टक्केची अतिरिक्त परफॉर्मन्स गॅरंटी द्यावी लागेल. 

एमएसआयडीसीचे एकही टेंडर कमी दराचे नाही. केंद्रात गडकरी यांच्या खात्यात 30 ते 35 टक्के बिलोने निविदा होतात मग इथे का नाही. राज्य आर्थिक अडचणीत असताना जादा दराने टेंडर का ? मागील 3 ते 4 वर्षात मंजुर केलेली कामे व टेंडर तपासण्यासाठी एक त्रयस्थ समिती नेमावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. कंत्राटदार योग्य आहेत का, कागदपत्रे पाहावीत, केवळ टक्केवारी दिली म्हणुन काम दिले का? सेवानिवृत्त ऐवजी तुकाराम मुंडे सारखा अधिकारी नेमा म्हणजे खरे खोटे बाहेर येईल.एका बाजुला ना खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणायचे व दुसरीकडे सरसकट भ्रष्टाचार करायचा हे योग्य नव्हे असे ते म्हणाले. 

Previous Post

घरचा आहेर, पोलखोल – खराब रस्ते व अस्वच्छता, सत्ताधारी नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना ‘हाक’, समस्या सोडवा, धाराशिव शहराचे बेहाल

Related Posts

महाराष्ट्र

घरचा आहेर, पोलखोल – खराब रस्ते व अस्वच्छता, सत्ताधारी नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना ‘हाक’, समस्या सोडवा, धाराशिव शहराचे बेहाल

June 30, 2026
महाराष्ट्र

विहिरीचे काम पुर्ण झालेल्यांना विना अट पैसे द्या, आमदार पाटीलांची मागणी मंत्री गोगावलेनी केली मान्य

June 30, 2026
महाराष्ट्र

जप्तीचे आदेश – विठ्ठल साई व गोकुळ कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका, शेतकऱ्यांची कोट्यावधींची बिले थकीत

June 30, 2026
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सिबिलवरुन कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार का ?

June 29, 2026
महाराष्ट्र

मावस भावाच्या खुनाप्रकरणी आरोपीला जन्मठेप – 25 हजारांचा दंड, धाराशिव कोर्टाचा निकाल 

June 29, 2026
महाराष्ट्र

पत्नी व प्रियकर पिडीत पती – गुन्हा नोंद व कारवाईची मागणी, वटपौर्णिमेच्या दिवशी उपोषण आंदोलन 

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

धाराशिव मेडिकल कॉलेज इमारत टेंडरमध्ये घोटाळा – आमदार कैलास पाटीलांनी केली पोलखोल, अधिवेशनात आवाज

June 30, 2026

घरचा आहेर, पोलखोल – खराब रस्ते व अस्वच्छता, सत्ताधारी नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्यांना ‘हाक’, समस्या सोडवा, धाराशिव शहराचे बेहाल

June 30, 2026

विहिरीचे काम पुर्ण झालेल्यांना विना अट पैसे द्या, आमदार पाटीलांची मागणी मंत्री गोगावलेनी केली मान्य

June 30, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp