धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथे सापडलेल्या 10 कोटी रुपयांच्या हशीश ऑइल अमली पदार्थाच्या गुन्ह्यात धाराशिव पोलिसांना मोठे यश आली असुन आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवळपास 1 हजार किलो मीटर जात आरोपीला ओडिसा राज्यातील जनतापाई या नक्षलग्रस्त भागातून अटक केली. विशाखापट्टनम येथुन हे ड्रग्ज 1 हजार 500 किमी दुर असलेल्या मालेगाव व भुसावळ येथे पाठवले जात होते
पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चापोह महेबुब अरब, रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. ओडीसा राज्यात रवाना होवून आरोपीचा शोध घेताला असता तो जनतापाई या अतिशय दुर्गम पहाडी भागातील नक्षल प्रभावीत क्षेत्रात राहण्यास असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र व नंतर ओडिसा अश्या 4 राज्यातून नक्षलग्रस्त भागात जात धाराशिव पोलिसांनी त्याला 1 हजार किमी जाऊन अटक केली.
तांत्रिक तपासात ओडीशा राज्यातील हशिश ऑईल विक्री करणारा 33 वर्षीय मुख्य आरोपी प्रसेनजित खिरमहन दास याची माहिती मिळाली परंतु त्याचे फक्त नावच निष्पन्न झाले होते. तो कोठे राहतो ? तो कसा दिसतो? त्याची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे आव्हान धाराशिव पोलीसांसमोर होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली व नळदुर्ग पोलिस ठाण्यात आणले. अटकेनंतर मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे पोलिसांनी 10 कोटी 38 लाख रुपयांचे हशीश ऑइल पकडून अमली पदार्थाचे आंतरराज्य कनेक्शन समोर समोर आले होते. टोल नाक्यावरील 8 सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करून सुरुवातीला वसीम इंद्रिस शहा वय 33 आणि मोसीन हयात खान वय 39 ( दोघे, दरेगाव नाशिक) या 2 आरोपीना अटक करण्यात आली.
तुळजापूर नळदुर्ग रोडवर नाकाबंदी वेळी पोलिसांना एमएच 12 जीव्ही 1517 या गाडीवर संशय आला त्यावेळी त्यांनी पाठलाग केला असता आरोपीनी एक बॅग फेकून पळ काढला, त्यात 10 किलो 38 लाखांचे हशीश ऑइल हे अमली पदार्थ होते. गांजाच्या झाडाचा गर काढुन हशीश ऑइल बनवले जात होते, आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टणममधुन ऑइल आणुन मालेगाव येथे ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी नेले जाणार होते. हे हशीश ऑइल मालेगाव व भुसावळ येथे जवळपास 1 हजार 400 किलो मीटर अंतरावर सप्लाय करीत होते. 2 आरोपीना अटक करून 114/2026 NDPSACT कलम 8 (क),20(ब),(ii),(C) 25,29 अन्वये नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.












