धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे नगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असुन तो मंजुर करण्यात आला आहे. राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या हालचालीना वेग आला आहे. उपनगराध्य पदासाठी अमित दिलीपराव शिंदे यांची दावेदारी असुन निवड निश्चित मानली जात आहे. लवकरच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
अक्षय ढोबळे यांनी वयक्तिक कारणामुळे नगराध्यक्षा नेहा ताई राहुल काकडे यांच्या राजीनामा दिल्यानंतर तो मंजुर केला आहे. ढोबळे यांना 6 महिने उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. अमित शिंदे हे अभ्यासू व अनुभवी असल्याने ते प्रबळ दावेदार असुन नगर परिषद निवडणुकीच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शिवाय पक्षश्रेष्टीनी त्यांना तसा शब्द दिला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 54 (1) अन्वये ढोबळे यांचा राजीनामा मंजूर करून नगराध्यक्षानी जिल्हाधिकारी यांना 24 सप्टेंबर रोजी कळविले आहे. कलम 51 अ 1 अ नुसार उपनगराध्यक्षांची निवड ही निवडून आलेल्या परिषद सदस्यामधून महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, 2005 नुसार करावयाची आहे. या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष हे पिठासीन अधिकारी असतील. त्यामुळे त्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.










