धाराशिव – समय सारथी
जिल्हा सत्र न्यायालयाचे नाव आजपासुन धाराशिव असे करण्यात आले असुन उच्च न्यायालयाने अधिसूचना काढल्यानंतर कोर्टाचे नाव उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असे करण्यात आले.
कोर्टाच्या बोर्डावरील नाव तात्काळ बदलण्यात आले त्यानंतर जिल्हा विधिज्ञ मंडळ तर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अँड रविंद्र कदम,उपाध्यक्ष अँड शिरीष गिरवलकर,अँड हेमंत शेरकर, कोषाध्यक्ष अँड प्रदीप टेळे, वरिष्ठ विधिज्ञ अँड राम गरड,अँड नितीन भोसले,अँड देवळे,अँड वट्टे ,पांडुरंग लोमटे,दयानंद बिराजदार,धैर्यशील सस्ते व वकील हजर होते