धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात निवडणुक आयोगाच्या पथकाने कारवाई करीत साडे पाच लाख रुपयांची कॅश तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पकडली आहे. विधानसभा निवडणुक सुरु असल्याने अनेक ठिकाणी तपासणी नाके व पथके तैनात करण्यात आली आहेत, तामलवाडी येथे तपासणीत एका गाडीत ही कॅश सापडली आहे. या कारवाईबाबत तुळजापूर विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढव्हळे यांनी पुष्टी दिली आहे.
पोलिस व निवडणूक आयोग याची पडताळणी करीत असुन कॅश जप्त करण्यात आली आहे. ही कॅश कर्नाटक येथील व्यापारी यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात एका व्यक्तीला 50 हजार पेक्षा अधिकची रक्कम जवळ बाळगता येणार नाही, त्यापेक्षा अधिक रक्कम सापडल्यास ती जप्त करण्यात येणार असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. 50 हजार पेक्षा अधिक रक्कम असल्यास ती जप्त करण्यात येणार आहे.