धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सामान्य प्रशासन विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केलेल्या लेखापरीक्षणाचा अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद धाराशिवच्या कामकाजातील आर्थिक व्यवहार, प्रशासकीय प्रक्रिया तसेच लेखापरीक्षणादरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींचा समावेश असलेला हा अहवाल जिल्हा परिषद धाराशिवच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
लेखापरीक्षण अहवालामध्ये स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणे,आक्षेप,त्रुटी अथवा इतर नमूद बाबींचा तपशील समाविष्ट असून,नागरिकांना हा अहवाल पाहता यावा आणि जिल्हा परिषदेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती उपलब्ध व्हावी,या उद्देशाने तो सार्वजनिक करण्यात आला आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना संकेतस्थळावरील तसेच नोटीस बोर्डावरील अहवालाचा अभ्यास करून आवश्यक माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.












