Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरण – सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबरला तर उच्च न्यायालयात 25 सप्टेंबरला सुनावणी

समय सारथी by समय सारथी
September 8, 2024
in महाराष्ट्र
0
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी – तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरण
0
SHARES
233
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणात राज्य सरकारने दाखल केलेल्या एसएलपी याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे तर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिका प्रकरणी 25 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तुळजाभवानी सिंहासन पेटी लिलाव व सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीने अहवाल दिल्यानंतर गुन्हे नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिले होते मात्र आदेश देऊनही गुन्हा नोंद न केल्याने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे तर गुन्हा नोंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असुन त्यावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

अवमान याचिका प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांना 2 सप्टेंबर पर्यंत म्हणणे अर्थात काय कारवाई केली हे उच्च न्यायालयात सादर करायचे होते मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्याचे सरकारच्या वतीने कोर्टात मांडण्यात आले त्यामुळे 2 सप्टेंबरची सुनावणी पुढे ढकलत 25 सप्टेंबर ला ठेवली आहे. गुन्हा नोंद होऊ नये यासाठी राज्य सरकारकडुन सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 

उच्च न्यायालयाचा गुन्हा नोंद करण्याचा निर्णय न्यायसंगत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकार, अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका (SLP स्पेशल लिव्ह पिटीशन) दाखल करण्यात आली आहे. हिंदु जन जागृती समिती व तुळजाभवानी मंदीर संस्थान यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. 

गृह विभागाने जिल्हाधिकारी यांनी मागणी केल्याप्रमाणे सीआयडीच्या अहवालाची प्रत पाठवली आहे शिवाय प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने तोपर्यंत गुन्हा नोंद करू नये असे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्याचे केंद्र व राज्य सरकार हिंदुत्ववादी विचाराचे असल्याचा दावा करीत जय भवानी, जय शिवाजीचा नारा देते मात्र त्याच तुळजाभवानी देवीच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या काही भ्रष्ट अधिकारी यांना वाचवण्यासाठी अटोकात प्रयत्न करते आहे, हे वास्तव आहे.

तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांच्यासह ठेकेदार, तत्कालीन लोकप्रतिनिधी यात अडकले आहेत. 1991 ते 2009 या काळातील 39 किलो सोने आणि 608 किलो चांदी असा 8 कोटी 45 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल पुणे सीआयडी व लातुर धर्मादाय आयुक्त यांनी दिला होता त्यानंतर संबंधित दोषीवर कारवाई करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तुळजापूर पोलिस ठाण्यात कलम 420, 467,468,471,406, 409 अंतर्गत गुन्हा नोंद करुन याचा तपास सीआयडी विभागाच्या पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करावा असे आदेश न्यायमूर्ती शैलेश भ्रहमे व मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने 9 मे 2024 रोजी राज्य सरकारला दिले आहेत.

उच्च न्यायालयाने मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तर राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना साधी नोटीस काढली आहे. 25 सप्टेंबर पुर्वी त्यांचे आता म्हणणे सादर करत उत्तर द्यायचे आहे. न्यायमुर्ती खोब्रागडे व रवींद्र घुगे यांनी हे आदेश दिले आहेत.

असा घातला घोटाळा, यांचा सहभाग –

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मंदीराचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर 1991 रोजी झालेल्या विश्वस्त समिती बैठकीत सिंहासनपेटी ह्या मंदीर संस्थानने चालविन्याचा ठराव घेतला त्यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष खलील अहमद, उपविभागीय अधिकारी मांडूरके, तहसीलदार बी वाय कुलकर्णी, व्यवस्थापक वि दा व्यवहारे यांनी मंजुरी दिली मात्र एका महिन्यातच 2 ऑक्टोबर 1991 रोजी याचं मंडळींनी तातडीची विश्वस्त समितीची बैठक घेऊन दानपेटी लिलावाला मंजुरी दिली तेव्हापासुन या घोटाळ्यास सुरुवात झाली. 1991 ते 2009 या काळातील 12 जिल्हाधिकारी व इतरांना 26 मुद्यावर प्रश्नावली देऊन चौकशी करण्यात आली, यात दिलीप नाईकवाडी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. दानपेटी संख्या वाढविणे, ठेकेदार यांनी लिलावाची रक्कम न भरणे, नियम आर्थिक फायद्यासाठी सोईनुसार बदलणे, सरकारी लिलाव पेक्षा अर्ध्याहुन कमी बोलीत लिलाव देणे, लिलावात नसताना सह्या घेणे असे प्रकार केले आहेत. 

Previous Post

श्री सिद्धिविनायक परिवाराच्या 2 कारखान्यात रोलर पुजन कार्यक्रम संपन्न – तयारी हंगामाची, विश्वासातुन प्रगतीकडे वाटचाल

Next Post

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या लोगोसाठी स्पर्धा – 3 लाखांचे बक्षिस असणार, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

Related Posts

महाराष्ट्र

काळा दिवस – 50 शिवसैनिक पदाधिकारी नजरकैदेत, म्हणे उपमुख्यमंत्री यांना धोका – सावंत गट निशाण्यावर, संमती, हुकूमशाहीची नांदी

April 13, 2026
महाराष्ट्र

राडा – महाकाली कला केंद्रावर तोडफोड – 12 जणांवर गुन्हा नोंद, कारण अज्ञात, आरोप प्रत्यारोप, 8 लाखांचे नुकसान

April 12, 2026
महाराष्ट्र

भुकंपाचे सौम्य धक्के, 4.7 रिस्टर स्केल – नांदेड जिल्ह्यात केंद्रबिंदु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 11, 2026
महाराष्ट्र

मंदीर प्रवेश बंदी – 10 भाविकांवर तुळजाभवानी मंदीर संस्थानची कारवाई,गुन्हा नोंद – गोंधळ हाणामारी भोवली

April 10, 2026
महाराष्ट्र

पाठपुराव्याला यश – लातूर येथे अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, आमदार अभिमन्यु पवार

April 10, 2026
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवमध्ये – कै अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार व पुण्यनगरी बक्षीस व पुरस्कार वितरण

April 10, 2026
Next Post
कायापालट, निविदा प्रसिद्ध – तुळजाभवानी मंदीर व परिसराचा विकास होणार, 54 कोटींची कामे

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या लोगोसाठी स्पर्धा - 3 लाखांचे बक्षिस असणार, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

काळा दिवस – 50 शिवसैनिक पदाधिकारी नजरकैदेत, म्हणे उपमुख्यमंत्री यांना धोका – सावंत गट निशाण्यावर, संमती, हुकूमशाहीची नांदी

April 13, 2026

राडा – महाकाली कला केंद्रावर तोडफोड – 12 जणांवर गुन्हा नोंद, कारण अज्ञात, आरोप प्रत्यारोप, 8 लाखांचे नुकसान

April 12, 2026

भुकंपाचे सौम्य धक्के, 4.7 रिस्टर स्केल – नांदेड जिल्ह्यात केंद्रबिंदु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 11, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp