धाराशिव – समय सारथी
ABRSM संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा धाराशिवच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षक परिषद धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हुकीरे, जिल्हा कार्यवाह सतीश जाधवर, कोषाध्यक्ष मारुती कोरे तसेच तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार समारंभास शिक्षक परिषद प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे, संघाचे जिल्हा कार्यवाह अजय जानराव, मार्गदर्शक सतीश कानडे, विशाल जाधव, सचिन हुलसुलकर, सुखदेव भालेकर, ज्ञानेश्वर केवळराम, वनवे सर यांच्यासह शिक्षक परिषद पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











