Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

दीड लाख नावे मतदार यादीतुन वगळली जाणार – SIR कार्यक्रमाला सुरुवात, जिल्हाधिकारी पुजार

समय सारथी by समय सारथी
May 20, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.1k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यातील जवळपास दीड लाख नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. 14 लाख 16 हजार 943 मतदार असून,त्यापैकी 12 लाख 23 हजार 902 मतदारांची गणना पूर्ण झाली आहे.सुमारे 1 लाख 94 हजार मतदारांची गणना अद्याप बाकी आहे. 49 हजार 780 मतदारांची नावे दुबार मतदारांमध्ये आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सुमारे 46 हजार मतदार बाहेरगावी असून 40 हजार मतदार मयत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. या मोहिमेत जिल्ह्याने राज्यात सहावा तर मराठवाडा विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या प्रक्रियेस सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.विशेषतः जास्तीत जास्त मतदान बुथ प्रतिनिधी नेमून मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) बैठकीत पुजार बोलत होते.यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी डॉ.स्मिता शहापूरकर,भारतीय जनता पार्टीचे ॲड.नितीन भोसले,बहुजन समाज पार्टीचे महादेव वाघमारे,प्रवीण जगताप यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर (रोहयो) आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या प्रगणकांकडून घरभेटीद्वारे मतदार यादीचे घर सुचीकरण व जनगणनेचे काम सुरू आहे मात्र काही नागरिक घरी आढळून आलेले नाहीत,तर काहींचे इतरत्र स्थलांतर झाल्याचे दिसून येत आहे.परिणामी,अशा मतदारांची नावे आगामी मतदार याद्यांमधून वगळली जाण्याची शक्यता आहे.ही परिस्थिती टाळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त बुथ प्रतिनिधी नियुक्त करून मतदार नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करावे,असे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 1 हजार 523 मतदान बुथ एजंट नियुक्त केले असून,इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही आपल्या स्वाक्षरीने बुथ प्रतिनिधींची नावे तातडीने जिल्हा प्रशासनाकडे पाठवावीत,असे आवाहन पुजार यांनी केले. आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची सर्वांनी दक्षता घ्यावी,असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सध्या 1523 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी 892 अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.अर्ज क्रमांक 6, 7 आणि 8 भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनरीक्षणासाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अहर्ता तारीख निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेटी देणार आहेत. 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण करण्यात येणार असून 5 ऑगस्ट 26 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये नाव वगळले गेले असल्यास किंवा समाविष्ट नसल्यास संबंधितांना 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर दरम्यान नोटीस टप्पा,दावे व हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, 7 ऑक्टोबर 26 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती पुजार यांनी दिली.

Previous Post

उस्मानाबाद राहणार विधान परिषद मतदार संघांचे नाव – अमर्याद खर्च, उमेदवारांना नसणार बंधन

Next Post

वकीलाला अपशब्द, अट्रॉसिटीची धमकी – महिला तक्रार निवारण केंद्रातील प्रकार

Related Posts

महाराष्ट्र

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026
महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
Next Post

वकीलाला अपशब्द, अट्रॉसिटीची धमकी - महिला तक्रार निवारण केंद्रातील प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

राजाभाऊ पवार यांनी घेतले डॉ पद्मसिंह पाटीलांचे आशीर्वाद – भाजपच्या वाटेवर शिक्कामोर्तब

August 27, 2026

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp