धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव झाले असले तरी विधान परिषद मतदार संघांचे नाव हे उस्मानाबाद, लातुर व बीड असे आणणार आहे. परिसिमन न झाल्याने हे नाव तोपर्यंत तसेच उस्मानाबाद राहणार आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार यांना लोकसभा, विधानसभा प्रमाणे खर्चाची मर्यादा नसणार असुन अमर्याद खर्च करता येणार आहे. विधान परिषद निवडणुक ही धनदांडगी व व्यापारी तत्वाची खर्चिक म्हणुन ओळखली जाते, इथे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार चालतो.
उस्मानाबाद लातुर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा झाली असुन या 3 जिल्ह्याच्या मतदार संघात 1051 मतदार असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. यावेळी जिल्हा निवडणुक अधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यासह अधिकारी उपस्थितीत होते.
धाराशिव व लातुर या 2 जिल्हा परिषदेतून 114 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती सभापती असे 132 मतदार असणार आहेत. लातुर महानगरपालिका 70, बीड, धाराशिव व लातुर या 3 जिल्ह्यातील 30 नगर परिषद व नगर पंचायत मधुन 776 निवडून आलेले व 73 प्राधिकृत केलेले असे 849 मतदार असणार आहेत. प्रशासनाने या निवडणुकीची तयारी सुरु केली असुन अधिकारी व विविध राजकीय पक्षाच्या बैठका घेतल्या आहेत.












