धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील सिद्धाई मंगल कार्यालयात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. पार पडलेला शिवसैनिकांचा मेळावा म्हणजे शिवसैनिकांच्या ऊर्जेचा मेळावा, ही ऊर्जा आहे एकनिष्ठ मावळ्यांची, ही ऊर्जा आहे गद्दारीविरोधात आवळलेल्या वज्रमुठेची आहे असे मनोगत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी ह्या शिवसैनिक मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करत आता एकजुटीने सोबत राहण्याची आणि लढण्याची वेळ आलीय, असे म्हणत संवाद साधला.
ह्या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.












