धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सत्ता परिवर्तनानंतरचा पहिलाच जनता दरबार रविवारी संपन्न झाला त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.विकास, निधी व रखडलेली कामे या कारणामुळे शिवसेना शिंदे गटात अर्थात सत्तेत प्रवेश केल्याचे ओमराजे यांनी जाहीर केले होते त्यामुळे त्यांच्या या जनता दरबाराकडे लक्ष लागले होते.
संकटातून मार्ग काढण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठीच हा जनता दरबार असतो. आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे, प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहिलं. संबंधित विभागांशी त्वरित संपर्क साधत अनेक समस्यांवर जागेवरच तोडगा काढला असे खासदार ओमराजे म्हणाले.
जनतेचे प्रश्न म्हणजे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.
आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे… आणि असेच पुढेही राहणार. आपल्या प्रेमाला, विश्वासाला आणि पाठिंब्याला मी खंबीरपणे न्याय देईन, हेच माझं वचन आहे अशी पोस्ट त्यांनी केली.












