धाराशिव – समय सारथी
ओमराजेचं भाषण आहे, तोच बोलला होता. दादानों, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर काय बोलता ? गद्दार… मग मला सांगा चारशे वर्षे झाली, त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार? आता याच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग कधी पुसणार ? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवला. गद्दारांची कुटुंबे कसाबाची आहेत. मी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही गद्दार फोडा, तुमच्या उरावरती भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही
काही जण म्हणतात मी फिरत नाहीत, मी कालपासून फिरतोय, मी फिरल्यानंतर काय होते हे तुम्ही पाहताय. गद्दारांचे नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. माझी सभा नसून कौटुंबिक बैठक आहे सगळे माझे कुटुंबीय आहेत मी त्यांना भेटी देत आहे.
आमदार कैलास पाटील यांच्यासमोर कोटींचे अमिष 2022 साली दिले होते. मात्र, त्यांनी शिवसेनेची गद्दारी केली नाही. त्यामुळे आमदार पाटील यांच्यासह खासदार सावंत, देसाई, खासदार राऊत ही जीवाला जीव देणारी माणसे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कळंब येथील सभेत स्टेजवर येऊन एका शेतकऱ्याने बटव्यातील निधी ओमराजेसाठी दिली. त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचा एक रुपयाला किंमत आहे. परंतू, या गद्दाराच्या 100 कोटीला काहीच किंमत नाही.
ओम राजे हा वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा होता. त्यांचे भयंकर कारनामे आहेत, हे मला आता माहित झाले आहे. अगोदरच माहीत असते तर मी उमेदवारी दिली नसती आणि तुम्ही मतदान केले नसते असे सांगत त्याला उमेदवारी दिली, ही माझी मोठी चूक झाली असे सांगत त्यांनी जनतेची माफी मागितली. तसेच आता त्यांच्या रिलीज येतात विमानामध्ये बसण्यासाठी यांच्याकडे कुठून पैसा आला ? असा प्रश्न उपस्थितीत केला.
प्रधानमंत्री मोदी सोने खरेदी करू नका म्हणतात. मात्र खासदार खरेदी करीत आहेत. राज्यात व देशात अंदाधुंद माजलेली असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मी मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली. अजून सत्तेवर असतो तर कदाचित पुढच्या पंचवार्षिकमध्ये देखील दुसऱ्यांदा कर्जमाफी केली असती असेही त्यांनी सांगितले. परंतू या सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप करीत ते कर्जमाफी नसून कर्ज वसुली असल्याचे त्यांनी नमूद केले.
आ कैलास पाटील शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनास मी किंवा आदित्य ठाकरे नक्की येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत असल्याची भावनिक साद घालताच उपस्थितांमधून प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये एकप्रतिसाद दिला.
खासदार भाजपाऐवजी इतर पक्षात का ? खासदार व आमदार म्हणजे शिवसेना नव्हे
केंद्रातील सरकारकडे बहुमत असताना देखील शिवसेना खासदार व आमदार फोडले जातात. खासदार आमदार फोडले म्हणून शिवसेना संपत नसते. जोपर्यंत ठाकरे आहेत तोपर्यंत शिवसेना नाही. खासदार व आमदार म्हणजे शिवसेना नव्हे असे सांगत आम्ही जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे खासदार फोडून ते भाजपामध्ये घेण्याऐवजी इतर पक्षात पाठविण्याचे कटकारस्थान केले जात आहे. कारण केंद्रीय भाजपा अंतर्गत मारामारी सुरू असून प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हा खटाटोप अमित शहा करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. त्यामुळे शिवराजसिंह चौहान, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांना संपवायचा विडा शहा यांनी उचलला असल्याचा घणाघात त्यांनी केला.
धाराशिव येथील सिध्दाई मंगल कार्यालयात एकनिष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, खा, अरविंद सावंत, आ.कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, जिल्हाप्रमुख नंदू राजेनिंबाळकर, रणजीत पाटील, सह संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, कमलाकर चव्हाण, महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे, शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, माजी आमदार दयानंद गायकवाड, शिवसेना नेते अविनाश कोळी, जिनत सय्यद, जगदीश पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.












