धाराशिव – समय सारथी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गरोदर केल्याप्रकरणी आरोपी किरण सुभाष तिबुले यास 20 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर के राजेभोसले यांनी सुनावली. अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अशिष कुलकर्णी यांनी केलेले प्रभावी युक्तिवाद आणि पुरावे सादर केल्याने शिक्षा सुनावली.
पिडीताने फिर्यादी दिली की, गेल्या 6 महिन्यापूर्वी पासून खामसवाडी येथील आरोपी किरण सुभाष तिबुले याने जीवे मारण्याची धमकी देवून पिडीतेस घरामध्ये बोलवून घेत लैंगीक अत्याचार करुन शारिरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. पोलीस स्टेशन शिराढोण येथे गुन्हा नोंद होवून तपासिक अधिकारी गंगाधर पुजेरवाड यांनी दोषारोपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीची साक्ष तसेच इतर साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष डीएनए अहवाल असे साक्षी पुरावे महत्वपूर्ण ठरले व सरकारी वकील ऍड अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपीस 20 वर्ष व दंडाची शिक्षा सुनावली.












