Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हमरीतुमरी – कृष्णा मराठवाडा कार्यक्रमात आमदार राणाजगजीतसिंह पाटील व धीरज पाटील यांच्यात वाद

समय सारथी by समय सारथी
October 7, 2024
in महाराष्ट्र
0
हमरीतुमरी – कृष्णा मराठवाडा कार्यक्रमात आमदार राणाजगजीतसिंह पाटील व धीरज पाटील यांच्यात वाद
0
SHARES
9.8k
VIEWS

मी पण तुळजापुरचा पाटील.. पुन्हा बाळा… कुत्र्याची उपमा ते डॉबरमॅन

तुळजापूर – समय सारथी

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील कार्यक्रमात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यात जोरदार वाद होत खडाजंगी झाली. सिंदफळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यात दोन्ही पाटील आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला. कार्यक्रम राजकीय की प्रशासकीय यावरून वादाला सुरुवात झाली, कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह यांनी सांगितल्यावर धीरज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व इतर आजी माजी लोकप्रतिनिधी यांना का बोलावले नाही असा सवाल करीत आक्रमक झाले. तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला त्यांचे नाव सुद्धा घेत नाही व श्रेय डॉ पद्मसिंह पाटील यांना देता असा सवाल केला. 

आमदार राणा यांनी बाळा म्हणताच पुन्हा वाद पेटला, तु धाराशिवचा पाटील असशील पण मी पण तुळजापूरचा पाटील आहे असे म्हणत आव्हान दिल्यानंतर शाब्दिक वाद वाढला. अंगाला हात लावू नका इथं पर्यंत हमरीतुमरी गेली. शेतकऱ्यांना भुसंपादन मावेजा दिला नाही यासह अन्य मुद्दे वादात भर घालणारे ठरले.  कार्यक्रम स्थळावरून जाताना राणा पाटील यांनी पत्रकारांना चावणाऱ्यांची प्रतिक्रिया घेताय का असे म्हणतात धीरज पाटील यांच्यावर निशाणा साधला त्यावेळी धीरज पाटील यांनी प्रतिउत्तर देत राणा पाटील यांना डॉबरमॅनची उपमा देत भौ भौ असे हिणवले व त्यांच्या वागण्याचा व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला त्यानंतर विनोद पिटू गंगणे, संतोष बोबडे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला त्यांनी सुद्धा आमदार राणा यांचे वागणे चुकले असे मान्य करीत पाटील यांना शांत केले. 

यापूर्वी बाळा शब्दावरून आमदार राणा व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा वाद झाला होता, त्यानंतर पुन्हा बाळा या शब्दावरून धीरज पाटील व आमदार राणा यांच्यात वाद झाला. बाळा असे बोलणे आमदार राणा यांना चांगलेच अंगलट आल्याचे दिसले. 

शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही, तब्बल 10-12 वर्ष झाले तरी शेतकरी मदतीपासुन वंचित आहेत त्याचं बरोबर कामे अपूर्ण असताना कार्यक्रम केले जात आहेत हे खपवून घेतले जाणार नाही असा सवाल आमदार राणा यांना करण्यात आला त्यावेळी आमदार राणा यांनी हा कार्यक्रम प्रशासनाने आयोजित केला आहे त्यामुळे अधिकारी यांना विचारा असे सांगितले. धीरज पाटील व इतर लोक प्रश्न विचारत असताना आमदार पाटिल यांनी त्यांच्या खास शैलीत स्मित हास्य केले तेव्हा तुम्ही असे हसू नका, उत्तर द्या असे पाटील म्हणाले. त्यानंतर राजकीय नौटंकी बंद झाली असेल तर बाहेर जा, पळ काढु नका असे आमदार राणा हे म्हणाल्यावर वाद चिघळला. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत इथे बसू असे म्हणत धीरज पाटील यांनी ठिय्या मांडला व कार्यक्रमात शेवटपर्यंत उपस्थितीत राहिले. त्यानंतर निघताना पुन्हा आमदार राणा यांनी धीरज पाटील यांना डीवचल्यानंतर वाद विकोपाला गेला.

काँग्रेस आक्रमक – डॉबरमॅन कुत्रा आणत आंदोलन करीत निषेध

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकरी व धीरज पाटील यांना चावणाऱ्या कुत्र्याची उपमा दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला. वादावेळी धीरज पाटील यांनी राणा पाटील यांना डॉबरमॅनची उपमा दिली होती त्यामुळे आंदोलनस्थळी डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याला आणत ए राणा भुंकू नकोस असे म्हणत उपहासात्मक आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. 

नेत्यांचे भांडण मैदानात तर कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर रिल्स, पोस्टरबाजी 

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व धीरज पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते यांनी यात उडी घेतली व फेसबुकसह अन्य सोशल मीडियावर रिल्स व पोस्टरबाजी केली. खरा पाटील कोण, डॉबरमॅन नामकरण, हाती चले बाजार कुत्ते भौके यासह निक्कीच्या बाई काय हा प्रकार, लोकनायक, काही दिलसे असे गाणे लावत समर्थनार्थ रिल्स तयार करण्यात आल्या. तुळजापूर मतदार संघातील वाद धाराशिव पर्यंत येऊन पोहचला.

Previous Post

खळबळजनक खुलासा – नॉन क्रेमीलिअर प्रकरणात आरोप तथ्यहीन, कायदेशीर कारवाई करू

Next Post

पारदर्शक कारभार – डॉक्टरांसह विविध पदांची नौकर भरती, आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post
पारदर्शक कारभार – डॉक्टरांसह विविध पदांची नौकर भरती, आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

पारदर्शक कारभार - डॉक्टरांसह विविध पदांची नौकर भरती, आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp