धाराशिव – समय सारथी
एकीकडे सात जन्माच्या जोडीदारासाठी वट पौर्णिमा साजरी केली जात असताना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एका पत्नी पिडीत पतीने उपोषण सुरु केले आहे. पत्नी व तीच्या पोलिस असलेल्या प्रियकराच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून आंदोलन केले.
निवेदनानुसार तुळजापूर पोलिस अंतर्गत मंगरूळ बीट येथे कार्यरत असलेले जयहरी वाघूलकर व राणी हेडे हिचे गेल्या अनेक दिवसापासुन अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांचा नियमित संपर्क असुन ते बाहेर एकत्र जातात. त्यांनी शाळेत शिकणाऱ्या मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला एकत्र मिळून काढला.
जयहरी यांनी फूस लाऊन बायकोला पळविले असुन पोलिस व बायकोचे मोबाइल सीडीआर लोकेशन पाहावे. त्यांच्या गुन्हा नोंद करून निलंबित करण्याची मागणी पत्नी पिडीत उपोषणार्थी भरत बाबुराव हेडे यांनी केली असुन त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु केले आहे.











