धाराशिव – समय सारथी
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तीचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला असुन एका आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथील अरबाज सय्यद याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असुन लव्ह जिहादचा हा एक प्रकार आहे. तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 64(1), 78, 351(3) व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
अरबाज याने तुळजापूर शहरातील एका मुलीला जाळ्यात ओढून बळजबरीने लॉजवर नेहून बलात्कार केला व मुलीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढले त्यानंतर तिला त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. टिप्पर चालक असलेल्या अरबाजने पीडितेच्या भावाला टिप्पर खाली घालुन जीवे मारील अशी धमकी देऊन वारंवार विविध लॉजवर नेहून बलात्कार केला. दुसऱ्या एका मुलीचे आधार कार्ड वापरून तिला वेगवेगळ्या लॉजवर नेले. किंग्ज लॉज तुळजापुर, धाराशिव रोडवरील गारवा लॉज व शिवम लॉज कावलदरा येथे नेऊन बलात्कार केला अशी मुलीने तक्रार दिली.
मुलीवर बलात्कार सह विविध अन्याय केला करून बळजबरीने धर्म परीवर्तन करून घेऊन तिला हिजाब व बुरखा घालण्यास भाग पाडले, तीचे हिंदू नाव बदलून मुस्लीम धर्मातील नाव दिले असा आरोप पीडितेच्या वडिलांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे,त्या दृष्टीने सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.












