धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीला जाणार नसल्याची माहिती आहे. ओमराजे हे पुण्यात असुन ते बैठकीला जाणार नाही त्यामुळे त्यांचा शिवसेना शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर एक प्रकारे शिक्का मोर्तब झाले आहे . कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल 20 जुन रोजी लागणार असुन त्या निकालानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत, निकालानंतर ते भुमिका जाहीर करणार आहेत.
नात्याने चुलत भाऊ माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राईव्हर समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असुन ते जामीनावर आहेत. या हत्याकांड नंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले होते, डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश घेतला. आता निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप होऊ शकतात.











