Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

निकाल – राजकीय समीकरण व पडसाद – डॉ पाटील 3 महिन्यात बाहेर, 2 शुटरला 16 वर्ष व जैनला 14 वर्षांनी जामीन – ‘हे’ कायदेशीर पर्याय

समय सारथी by समय सारथी
April 22, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.4k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात कोर्ट 14 मे रोजी निकाल सुनावणार आहे, या हत्याकांडाला 20 वर्ष झाले आहेत. नात्याने चुलत भाऊ असलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन यात आरोपी असुन निकालाकडे लक्ष लागले आहे. 2006 साली झालेल्या या हत्याकांडनंतर धाराशिव जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या, त्याच प्रमाणे निकाल आल्यानंतर सुद्धा राजकीय पडसाद उमटणार आहेत. हत्याकांड नंतर डॉ पाटील साडे 3 महिन्यात जामीनावर बाहेर आले तर पारसमल जैन हा 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मिळाला.

एकेकाळी डॉ पद्मसिंह पाटील व पवनराजे निंबाळकर एकत्र होते, 1978 साली डॉ पाटील यांनी शेकापचे बलभीमराव देशमुख यांचा 9 हजार 516 मतांनी पराभव करून पहिल्यादा आमदार झाले, त्यानंतर सलग 7 टर्म ते निवडून आले. काही राजकीय मुद्यावरून डॉ पाटील व पवनराजे यांच्यात वितुष्ट आले. 2004 साली पवनराजे यांनी दंड थोपटत डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढवली त्यात 484 मतांनी डॉ पाटील विजयी झाले. पवनराजे यांचा पराभव झाल्यानंतर तेरणा ट्रस्ट व कारखानावरून आरोप प्रत्यारोप सुरु होत नेते कार्यकर्ते भिडले.

3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा यासाठी मोर्चा काढण्यात आला तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली, त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी 10 जुनला प्रफुल्ल पटेल व त्रिपाठी यांनी हकालपट्टी केली.

घटनेचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या आयबीएन लोकमत या प्रसार माध्यमाच्या गाडीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी 5 हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले त्यानंतर डॉ पाटील यांना 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन अलिबाग कोर्टाने 2 लाखांच्या बॉण्डवर जामीन दिला, ते साडे 3 महिन्यांनी बाहेर आले. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावले मात्र पराभव झाला, ते सक्रीय राजकारणापासून अलिप्त होत गेले.

हत्याकांड नंतर झालेल्या पहिल्याच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कै पवनराजे यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांचा 16 हजार 974 मतांनी पराभव केला. या हत्याकांडनंतर डॉ पाटील व निंबाळकर असे एकमेकासमोर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. डॉ पाटील परिवाराने विकासाचा मुद्दा पुढे करीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेरणा ट्रस्ट व हत्याकांड हे त्यांच्या पक्षबदलाचे एक कारण बोलले जाते. कालांतराने महायुतीच्या जागा वाटपात राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव सोडून तुळजापूर मतदार संघ निवडला, त्यांच्या पत्नी अर्चनाताई राजकारणात आल्या. राणाजगजीतसिंह व ओमराजे यांच्यात ‘बाळा’ शब्दावरून अनेकदा चकमक झाली.

डॉ पाटील यांच्यानंतर त्यांचा मुलगा, सुन, नातू हे राजकारणात आले. पवनराजे यांच्या हत्येनंतर काही काळ त्यांच्या पत्नी आंनदीदेवी तेरणा कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आल्या तर जयराजे हे उद्योगाकडे वळले. डॉ पाटील व निंबाळकर हा सत्तासंघर्ष गेली 2 दशकापासून व तिसऱ्या पिढीपर्यंत सुरु आहे. मल्हार पाटील हे आता ओमराजे विरोधात धुरा सांभाळत अनेकदा आव्हान देत असतात. वडिलांच्या हत्येत न्याय मिळावा यासाठी जय व ओमराजे हे गेली 20 वर्ष कायदेशीर लढा देत आहेत.

हत्याकांडातील सर्व आरोपी जामीनावर असुन डॉ पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. पारसमल जैन माफीचा साक्षीदार आहे, त्याला 14 वर्षांनी जामीन मिळाला, 25 मे 2009 ला अटक केली त्यानंतर तो 13 डिसेंबर 2023 पासून जामीनावर आहे. शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मंजुर करण्यात आला. दिनेश तिवारी याला 25 मे 2009 तर पिंटू सिंग याला 15 जुन 2009 रोजी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून एप्रिल 2025 पर्यंत दोन्ही संशयित आरोपी जेलमध्ये होते. महात्मा उर्फ पिंटू सिंग हा आरोपी दुसऱ्या एका गुन्ह्यात बिहार राज्यातील सिवान जेलमध्ये आहे.

हत्याकांडात आरोपीना शिक्षा झाल्यास त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे, त्यानंतर जामीन व अपील. आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यास सीबीआय किंवा निंबाळकर हे निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊन निर्णया विरोधात अपील करू शकतात. थोडक्यात दोन्ही पक्ष अपीलात जाऊ शकतात. निकालानंतर आरोप प्रत्यारोप होणार आहेत हे मात्र नक्की.

Previous Post

ठरलं, जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी – यावर्षीपासुन अंमलबजावणी, धाराशिव विशेष सभेत एकमत 

Next Post

संसार जुळला – चिमुकल्याच्या हाकेने 3 वर्षाचा वाद मिटला, पती पत्नी एकत्र – वकिलांची यशस्वी मध्यस्थी

Related Posts

महाराष्ट्र

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

October 14, 2026
महाराष्ट्र

सीबीआयचे उच्च न्यायालयात अपील – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पाटीलांसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

October 14, 2026
महाराष्ट्र

परभणी ड्रग्ज तस्करी, मिर्झासह 6 जणांचा जामीन मंजुर – कळंब गुन्ह्यात 2 आरोपीना वाढीव पोलिस कोठडी

October 13, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, कळंब ड्रग्ज तस्करी – 9 वा आरोपी अटकेत, 13 पर्यंत पोलिस कोठडी, पुरवठा करणारा जाळ्यात

October 10, 2026
महाराष्ट्र

जामीन नाकारला, जेलमध्ये मुक्काम – डान्स शिकविण्याचे बहाण्याने शिक्षकाने केला अत्याचार – आलम डान्स अकॅडमी

October 9, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – 8 वा आरोपी अटकेत, कळंब पोलिसांची कारवाई, तपासाला गती, धागेदोरे हाती

October 9, 2026
Next Post

संसार जुळला - चिमुकल्याच्या हाकेने 3 वर्षाचा वाद मिटला, पती पत्नी एकत्र - वकिलांची यशस्वी मध्यस्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मटका किंग थेट तुळजाभवानी गाभाऱ्यात, फोटो सेशन – आमदाराचे पीए दिमतीला, व्हीआयपी सेवा – सामान्य भाविकांची हेळसांड

October 14, 2026

सीबीआयचे उच्च न्यायालयात अपील – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पाटीलांसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

October 14, 2026

परभणी ड्रग्ज तस्करी, मिर्झासह 6 जणांचा जामीन मंजुर – कळंब गुन्ह्यात 2 आरोपीना वाढीव पोलिस कोठडी

October 13, 2026
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp