धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याच नाव ‘धाराशिव’ झाले असले तरी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ‘उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी’ असेच आहे. प्रशासकीय नाव बदलून अनेक महिने झाले असले तरी तेच नाव व बोर्ड वापरला जात होता.
विधान परिषद पत्रकार परिषदेच्या वेळी ही बाब निदर्शनास आणुन दिल्यावर जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी तो बोर्ड जुना असुन सध्या कार्यालयाचे नूतनीकरण सुरु आहे त्यामुळे तो बदलायचा राहिला आहे, लवकरच तो बोर्ड बदलुन धाराशिव करू असे सांगितले.
दरम्यान उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी नाव असलेला बॅनर वजा बोर्ड पत्रकार परिषद संपताच लागलीच काढुन टाकण्यात आला आता नवीन बोर्ड बसवण्याची प्रतीक्षा आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांनी सुद्धा ‘उस्मानाबाद’ नव्हे ‘धाराशिव’ आहे असे सांगितले.












