धाराशिव – समय सारथी
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावुन पाहिले काम केले, ओमराजे यांनी एका अधिकारी याचे बदलीचे काम करायला लावले. पक्ष प्रवेश करताच ओमराजे हे लागलीच कामाला सुरुवात केली. कार्यपद्धती हीच ओमराजे यांची ओळख असुन ती त्यांनी जपली. आता काही न बोलता आगामी काळात अनेक कामे करून दाखवू असे ते म्हणाले.
अणदूर येथील रहिवासी असलेले व धाराशिव जिल्हा रुग्णालयात काम करीत असलेले डॉ अविनाश शिवाजी गायकवाड यांच्या धाराशिव ते निलंगा येथील बदलीसाठी त्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांना फोन लावत हे पहिले काम असल्याचे सांगत करा असे म्हणाले, त्यावर आबिटकर यांनी करतो तुम्ही विनंती पत्र पाठवा.
ओमराजे यांच्याकडे मंत्री आबिटकर यांचा फोन नंबर नव्हता, त्यांनी मंगेश चिवटे यांना फोन करून नंबर घेतला व नंतर मंत्री यांना फोन लावला. अणदूर येथुन आलेल्या संबंधित यांनी ओमराजे यांचे आभार मानले.











