पाटील यांना 845 मते तर देशमुख यांना 124 मते
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड निवडणुकीत बसवराज पाटील विक्रमी 721 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे पाटील यांना 845 मते तर काँग्रेसचे देशमुख यांना 124 मते मिळाली.
भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय),तुळजापूर रोड, धाराशिव येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडली.












