धाराशिव – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा व मावळ येथील सुशांत सुतार याला 25 ऑगस्ट पर्यंत 1 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी 3 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने 1 दिवसांची कोठडी दिली. पोलिसांच्या तपासात काही नावे निष्पन्न झाली असुन विक्री व सेवन करणारे रडारवर आहेत.
ड्रग्ज हे विष असुन तरुण पिढी बरबाद करते, राजकीय नेत्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचुन काढा. राजकारणापेक्षा समाजहीत पहा. कोणत्याही पक्षाचा किंवा कोणाचाही वरदहस्त असला तरी त्याला तात्काळ तुरुंगात टाकून कठोरात कठोर कारवाई करा, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हे पोलिसांच्या सोबत आहेत असे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले होते. त्यानंतर ड्रग्ज तपासाला गती आली आहे.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. 11 ग्राम ड्रग्ज हे कमर्शीयल (व्यवसायीक) क्षमतेचे असल्याने सर्व आरोपी समोरील अडचणी वाढल्या आहेत. व्यवसायीक क्षमता असल्याने जामिनसह कायदेशीर अडचणी वाढणार आहेत.
निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे,लखन गायकवाड व अक्षय रिटे हे 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर मिर्झा व सुतार हे पोलिस कोठडीत आहेत. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे.












