धाराशिव – समय सारथी
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असुन रुग्णसेवेसारखे दुसरे सुख कशात नाही, रुग्णसेवेसाठी तेरणाच्या माध्यमातून 15 ते 18 कोटी रुपये तरतूद यावर्षी ठेवली आहे. किडनी ट्रान्सप्लॅन्ट परवानगी मिळाल्या नंतर कळंब येथील एका लहान बालकाचे 56 लाखांचे ऑपरेशन केले. रुग्ण सेवा केल्यासारखे दुसरे सुख कशात नाही. नियमित आरोग्य शिबीर घेण्याचा संकल्प व मनोदय मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी महाआरोग्य शिबीर उदघाट्न वेळी व्यक्त केला.
आरोग्य शिबीर हा चांगला संकल्प असुन याचा फायदा लोकांना होणार आहे. तेरणा जनसेवाच्या माध्यमातून कॅम्प सुरु असुन तेरणा माध्यमातून 2 लाख लोकांवर उपचार केल्याचे सांगितले. जनसेवेचे व रुग्णसेवेचे हे कार्य भाजपच्या माध्यमातून अविरत काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले.
यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, नगराध्यक्षा नेहा व राहुल काकडे, सतीश दंडनाईक, मराठवाडा संयोजक नितीन काळे, अनिल काळे, संपत डोके,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप शिंदे, प्रवक्ते ऍड नितीन भोसले, उप नगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सभापती प्रवीण माळी, रवी मुंडे, अभय इंगळे, नगरसेवक विलास लोंढे, सुजित साळुंके, अभिजीत काकडे, आकाश तावडे, सिद्धार्थ बनसोडे,वकील संघांचे अध्यक्ष ऍड खंडेराव चौरे, धनंजय पाटील, सागर दंडनाईक, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरदास, कुलदीप मिटकरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन शैलेंद्र चव्हाण उपस्थितीत होते.
रक्तात आहे राष्ट्रभक्ती, शुभेच्छा देऊ रक्तदानातुन असे म्हणत सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प करण्यात आला. मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप धाराशिव यांच्या समनव्यातुन धाराशिव येथे महाआरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री स्व अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित केले.
औषध वितरण, आयुष विभाग, रक्त तपासणी, दंत रोग, शल्य चिकित्सा, कान नाक घसा, मनोविकार, नेत्र रोग, बाल रोग, त्वचा रोग, अस्थीरोग, स्त्री रोग, फिजिओथेरपी, ईसीजी, आयुष्यमान भारत, आयुष, औषध वितरण असे अनेक विभाग कार्यरत होते.











