Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ग्रामविकास मंत्री गोरे धाराशिवला येणार – जिल्हा परिषद भेट व कार्यशाळा घेणार, अध्यक्षा अर्चना पाटील 

समय सारथी by समय सारथी
July 22, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
740
VIEWS

आपला जीवं धाराशिव – घोषवाक्य व थीम सॉंग तयार, विकासाचा रोड मॅप, अनेक योजना व संकल्पना

धाराशिव – समय सारथी

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे 27 जुलै रोजी सोमवारी धाराशिव येथे येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘आपला जीव धाराशिव – व्हीजन 2030’ हे घोषवाक्य/टॅग लाईन घेऊन अनेक योजना व कामे करण्यात येणार असुन त्यासाठी ‘आपला जीव धाराशिव’ यावर आधारित थीम सॉंग/गाणे सुद्धा बनविले असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन इमारत, शासकीय अधिकारी, सभापती व सदस्य यांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असुन 240 कोटींचा डीपीआर सरकारकडे सादर केला आहे. नमो अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. 

मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना व जिल्हा परिषदेची माहिती घेणे, 710 गावे ग्रामसमृद्ध योजनेत सहभागी होणारआहेत. शालेय विद्यार्थ्यांना रात्री 7 ते 9 मोबाईल व टीव्ही वापर बंद करण्यासाठी भोंगा लावण्यात येणार आहे. हे 2 मुख्य कार्यक्रम असतील. शिक्षक, अधिकारी व इतराना एक गाव दत्तक दिले जाणार आहे. शाळा एकत्रिकरण केले जाणार असुन शाळेत सीसीटीव्ही बसवली जाणार असुन किमान 5 तरी सीसीटीव्ही बसवल्या जाणार आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांना मोबाईल, इलेकट्रिक गाडी दिला जाणार आहेत. 

प्लास्टिक बंदी व चहाचे कप बंद असतील जे वापरणार त्यांना 1 हजार व त्या ग्रामपंचायतील 10 हजार दंड लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात येणार आहे, वृक्ष लागवड बरोबरच वृक्ष तोडीचे प्रमाण कमी करण्यासाठी 110 गावांना विद्युत शवदाहिनी देण्यात येणार असुन ती सौर ऊर्जेवर चालणार आहे. नावीन्य पुर्ण व सेस फंड वापरला जाणार आहे. जनसुविधेसाठी आलेल्या 42 कोटींचे नियोजन सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. 

इलेक्ट्रिक घंटागाडीचे नियोजन असुन त्यासाठी 770 गाड्या लागणार आहेत. 83 अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन त्यात संगणक, पुस्तके, वायफाय व इतर सुविधा असणार आहेत. 5 वी ते 7 वी पर्यंत मुलींच्या शाळेत स्वच्छता गृह असणार आहे, 140 टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्यात येणार आहे, जे कोणी याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचा 16 वित्त आयोग पैसे निधी दिली जाणार नाही अशी तंबी दिली.

प्रत्येक गावात एक बाग करण्यात येणार असुन खुली व बांधिस्त जीम व्यायामशाळा सुरु करण्यात येणार आहे. अंगणवाडीमध्ये टीव्ही व सोलर बसवले जाईल व जुन्या ठिकाणी पण बसविले जाणार आहेत. महिलांना अंगणवाडी येथे पोषण आहार देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने त्यांना दिल्या जाणाऱ्या निधीतून 1 सफाई कर्मचारी लावायचा असुन स्वच्छता व अभियासिका याची देखरेख करायची आहे. 

मनी बँक सुरु करण्यात येणार असुन शाळेत ही सुरु असेल. एमसीक्यू प्रश्न व उत्तर प्रतिका दिली जाणार असुन त्यांना मार्गदर्शन, परीक्षा घेतल्या जातील. अभ्यास सोबत एक कला यावी यासाठी प्रोत्साहन देणे, शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शेतात नेहून काम करणे, पेरणी असे शिकवले जाणार आहे. जनावरासाठी पाणवठे सुरु केले जाणार आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. डिसेंबरमध्ये बाल साहित्य संमेलन केले जाणार असुन त्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आहे.

जलजीवन मिशन योजनेत नळाला पाणी आले पाहिजे, तरच बील अदा केले जाईल, त्यासाठी अनेक बदल केले जाणार आहेत, असे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेत पट संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले असुन गेल्या वर्षी 92 हजार पट होता यावर्षी 98 हजार होईल. वृक्ष लागवडची जबाबदारी ग्रामपंचायतला देण्यात येणार असुन मेरी पंचायत ऍपवर ते ऍड करून संगोपन सुद्धा केले जाणार आहे. जे वृक्ष संगोपन करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही. 

केंद्रीय विद्यालयासाठीची जागा निश्चित केली असुन बार्शी नाका परिसरात हे सुरु केले जाईल असे त्या म्हणाल्या. केंद्रीय विद्यालयात अनेक सुविधा असणार आहेत, काही जण श्रेय घेत आहेत. कोणी खोडा घातला नाही तर ते लवकर सुरु होईल. त्यांना तात्पुरती इमारत दिली जाणार आहे. 

Previous Post

महाआरोग्य शिबीर – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, 20 विभाग, तपासणी व उपचार, उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे – 240 किमीच्या प्रकल्प अहवालासाठी मंजुरी, सर्वेक्षणाचे काम सुरु – विकासाला गती

Related Posts

महाराष्ट्र

‘दिवट्या आमदार’ तर ‘नासका आंबा’ – पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले 

September 19, 2026
महाराष्ट्र

अजब कारभार – ना दिनांक, ना जावक क्रमांक, पंचायत समिती संरक्षण भिंतीचे काम, राजहट्ट

September 19, 2026
महाराष्ट्र

पंचायत समितीचे 3 प्रवेशद्वार बंद – रस्ते सुद्धा बंद करण्याचे नियोजन, रातोरात यंत्रणा

September 18, 2026
महाराष्ट्र

शासकीय नर्सिंग कॉलेजला मान्यता, 100 विद्यार्थी क्षमता – खासदार ओमराजेंनी मानले सरकारचे आभार

September 18, 2026
महाराष्ट्र

डान्स शिकविण्याचे बहाण्याने अत्याचार – आलम डान्स अकॅडमी, गुन्हा नोंद, तपास सुरु – लव्ह जिहादचा आरोप

September 18, 2026
महाराष्ट्र

आंदोलन तात्पुरते स्थगित, 90 दिवसांचा वेळ – मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा, मनोज जरांगेंची भुमिका

September 17, 2026
Next Post

धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे - 240 किमीच्या प्रकल्प अहवालासाठी मंजुरी, सर्वेक्षणाचे काम सुरु - विकासाला गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

‘दिवट्या आमदार’ तर ‘नासका आंबा’ – पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले 

September 19, 2026

अजब कारभार – ना दिनांक, ना जावक क्रमांक, पंचायत समिती संरक्षण भिंतीचे काम, राजहट्ट

September 19, 2026

पंचायत समितीचे 3 प्रवेशद्वार बंद – रस्ते सुद्धा बंद करण्याचे नियोजन, रातोरात यंत्रणा

September 18, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp