शेती पिकेना, फीस व वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत – आदित्य ठाकरेंनी केली मदत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील दुष्काळ दौऱ्यात तुळजापूर तालुक्यातील खानापुर येथील एका मुलाने व त्याच्या पित्याने आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधताना व्यथा मांडली. दुष्काळामुळे शेती न पिकल्याने या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, फीस कशी भरायची याची चिंता असुन वडील आत्महत्या करतील म्हणुन तो नेहमी त्यांच्या सोबत राहतो. हे दुःख त्याने आदित्य ठाकरेंना सांगितले. त्यावेळी त्यांनी त्या कुटुंबाला आधार देत 5 हजारांची मदत केली.
ठाकरेंना यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहनी केली. यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सह संपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, संजय निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
अल्ताफ बेग कुटुंबाकडे 10 एकर शेती आहे मात्र शेतात उत्पन्न आले नाही, सगळे पैसे शेतात घरात खर्च केले. पैसे नाहीत हे घरात सगल्याना माहिती होते. मुलगा महंमद बेग हा आई जवळ झोपत असे मात्र तो आता वडील अल्ताफ बेग काही तरी करेल म्हणुन वडिलांसोबत सतत असतो. या कुटुंबाला पीक विमा मिळाला नाही. आदित्य ठाकरेंनी त्या कुटूंबाला आधार दिला व तातडीची आर्थिक मदत दिली. घरातील स्तिथी बिकट असुन अन्न धान्य नाही, शाळेची फीस भरायला पैसे नाहीत, अशी व्यथा मांडली.











