धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या एका शाळेत एका कुटुंबाने अतिक्रमण करून संसार थाटल्याचा प्रकार समोर आला असुन याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगर परिषदेच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी भेट दिली. नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक 5 मध्ये असलेल्या खोलीत एका कुटुंबाने संसार थाटला होता. शाळा बंद असल्याचे कारण देत तिथे घर, कबुतरखाना सुरु केला होता, अतिक्रमण केल्याचे समोर आले असले तरी माणुसकी म्हणुन या शिष्टमंडळाने शाळा खुली करण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली.

नगरसेवक राहुल काकडे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, सिद्धार्थ बनसोडे, आयाज उर्फ बबलु शेख, धनंजय पाटील यांच्यासह अधिकारी यांनी या शाळेला भेट दिली. 2012-13 या साली या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते त्यात 4-5 खोल्या, शौचालय बांधण्यात आले होते मात्र पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करण्यात आली. वापर होत नसल्याने तिथे एका कुटुंबाने घरासाठी वापर सुरु केला. SIR मोहिमेत प्रत्यक्ष घर तपासणी, भेटी दरम्यान हा गंभीर प्रकार समोर आला.

शाळेच्या खोलीचा घरासारखा वापर सुरु केला असल्याचे संबंधित व्यक्तीने मान्य केले मात्र आता घर शोधावे लागेल त्यानंतर सामान नेहू असे म्हणत मुदत मागितली. शिक्षण सभापती व नगरसेवकांनी 2 दिवसांची मुदत दिली. या शाळेच्या वर्ग खोल्या सुस्तिथीत असुन येथे शाळा किंवा अंगणवाडी सुरु करण्याचा प्रस्ताव देऊ असे नगरसेवक बबलु शेख म्हणाले. त्यांची मागणी मान्य करीत लवकरच दुरुस्ती करून वापर सुरु करू असे ठरले.












