भाजपच्या जुन्या कार्यकर्ते यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांवर नाराजी
धाराशिव – समय सारथी
मतभेद असु शकतात मात्र संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पोस्ट केली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर भाजप जुने कार्यकर्ते यांची कमालीची नाराजी आहे.
मतभेद असू शकतात, पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणी सक्षम नेतृत्व घडते. तुमची आमची, भाजपा सर्वांची अशी पोस्ट जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी केली आहे, यानंतर अंतर्गत नाराजीवर पडदा पडतो का ते पाहावे लागेल.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीपासुन आमदार राणाजगजीतसिंह पाईल यांनी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड अनिल काळे यांना अडविले, त्यांनी अपमान करीत वागणूक दिली असा आरोप काळे यांनी केल्यानंतर भाजपात असलेली अंतर्गत नाराजी बाहेर आली. माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी सुद्धा मनातील खदखद व्यक्त केली या पार्शवभुमीवर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मन मोकळे केले.
आम्ही सर्वांनी 30 वर्ष संघर्ष केला असुन कोणी पक्षाचा मालक होण्याचे प्रयत्न करू नये मान सन्मान घ्यावा व मर्यादा पाळाव्यात. एकाच घरात 2 संविधानिक पदे, स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या मग कार्यकर्तेनी आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का ? मुख्य पदाधिकारी यांचे फोटो न टाकणे म्हणजे मनाचा कोतेपणा दर्शवितो मात्र त्याने फरक पडत नाही असे चालुक्य म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते जसे वागत होते तसे इथे वागत आहेत मात्र हे जास्त काळ चालणार नाही. कार्यकर्ते पेक्षा वैयक्तिक समर्थक वाढविण्यावर व पोसण्यावर भर दिला जात आहे. काही जणांचा राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणुन ठरवून पराभव केल्याचा आरोप चालुक्य यांनी केली. जिल्ह्यात असलेल्या अंतर्गत नाराजीवर पक्षश्रेष्टीनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा चालुक्य यांनी व्यक्त केली.
पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यात एक कलमी कार्यक्रम सुरु असुन त्यांच्या सरंजामशाहीला अनेक जण कंटाळले असुन आम्ही आता सगळ्यांची मोट बांधत आहोत असे काळे म्हणाले. निष्ठावंत कार्यकर्ते हे यांचे लाभार्थी नसुन त्यांना मान आणि सन्मान हवा आहे. आमचा संघर्ष व तपस्या अमुल्य आहे, पक्ष कार्यकर्ते वाढवावेत, वयक्तिक समर्थक नकोत असे काळे भेटीनंतर म्हणाले. संपत्तीच्या जोरावर यांचे ‘हॉली डे’ पॉलिटिक्स असुन घराणेशाहीची लादली आहे, हे मान्य केले जाणार नसल्याचे ते म्हणाले. पक्ष कार्यकर्ते ऐवजी ते वैयक्तिक समर्थक वाढवत असल्याचा आरोप काळे यांनी केला.











