धाराशिव – समय सारथी
सत्याचा विजय झाला याच समाधान वाटत आहे, शेवटी न्याय मिळाला. आमच्या कुटुंबाला 20 वर्षानंतर न्याय मिळाला मात्र त्या काळात जो त्रास झाला तो कधीही भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया डॉ पद्मसिंह पाटील यांच्या सुन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या निकालानंतर दिली. डॉ पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
डॉ पाटील हे मुख्यमंत्री होणार होते मात्र ते झाले नाहीत त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नुकसान आले. लातूरला ते मिळाले मात्र धाराशिवला मिळाले नाही त्यामुळे जे खच्चीकरण झाले. आमच्यासह धाराशिव जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या मोठे नुकसान झाले. लातुरला मुख्यमंत्री पद मिळाले, डॉ पाटील यांच्या रूपाने मुख्यमंत्री पद धाराशिवला मिळाले असते मात्र ते मिळाले नाही.
आम्ही संपल्यात जमा होतो मात्र राणा दादा यांनी अतिशय मेहनतीने पुन्हा निर्माण केले. याच कारणाच्या धक्याने सासूबाई वारल्या. माझ्या दृष्टीने हे मोठे मानसिक नुकसान असुन प्रत्येक निवडणूकीत हे आरोप मोठे नुकसान होते. माझ्या मुलांच्या मनावर परिणाम झाले. आम्ही काही केले नाही त्यामुळे आमच्यावर काही येणार नाही याची शाश्वती होती. आम्ही काय केलं नाही यावर आम्ही वारंवार बोलत होतो, ते समोर आले. आम्ही काही केले नव्हते त्यामुळे भीती नव्हती, त्यांना सुद्धा माहिती होते की आम्ही खुन केला नाही फक्त राजकीय दृष्ट्या सोयीस्कर म्हणुन डॉ पाटील यांच्यावर आरोप करायचे.
याचमुळे राणा दादा यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी मी गावोगावी जाऊन मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगत होते, की आम्ही कोणाचा खुन केला नाही. लोकांचा आमच्यावर विश्वास होता. पवन काका नेहमी डॉ पाटील यांच्या सोबत असायचे ते एकत्र जेवण करीत मात्र नंतर दुरावा आला. पुढच्या पिढीपर्यंत हे वैमनस्य येऊ नये म्हणुन आम्ही खुप काही सहन केले.











