Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सीबीआयचा लेखी युक्तिवाद सादर – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, ‘या’ मुद्यावर भर – 2 सप्टेंबरला सुनावणी

समय सारथी by समय सारथी
September 6, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
416
VIEWS

खासदार ओमराजे निंबाळकर सुनावणीसाठी उपस्थितीत राहणार – कोर्टात लेखी म्हणणे सादर करणार

धाराशिव – समय सारथी

कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीबीआयने त्यांचा अंतिम युक्तिवाद सादर करीत लेखी म्हणणे सादर केले. सीबीआयने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने 20 मुद्दे उपस्थितीत केले असुन प्रत्येक मुद्दा व त्या मुद्याला पुरक असलेले पुरावे, कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत.  माफिचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन यांचा कोर्टातील कबुली जबाब व शूटर दिनेश तिवारी याने कोर्टात दिलेल्या 164 च्या जबाब व इतर परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यावर सीबीआयने भर दिला आहे. 

सीबीआयने खासदार ओमराजे निंबाळकर, आनंदीदेवी राजेनिंबाळकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे जबाब व इतर पुरावे सोबत जोडले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात होणार आहे. सर्व आरोपीना कोर्टाने सुनावणीला हजर राहण्याचे आदेशीत केले आहे मात्र गेल्या सुनावणीवेळी काही जणांच्या हजेरी माफीच्या अर्जाना अंतिम वेळी मंजुरी दिली.

कै पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या याचिकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता त्यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे बाजु मांडत आहेत, ते कोणत्या मुद्यावर लेखी म्हणणे सादर करतात हे पाहावे लागेल. पवनराजे यांचे पुत्र जय राजे निंबाळकर हे कोर्टात पाठपुरावा करीत असून 2 सप्टेंबरच्या सुनावणीला खासदार ओमराजे निंबाळकर कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे. 

सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाचे विशेष सरकारी वकील एजाज खान यांनी 25 व 26 ऑगस्ट रोजी अंतिम युक्तिवाद सादर केला. यावेळी सीबीआयच्या आयपीएस अधिकारी सायली धुरत यासह अधिकारी हजर होते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची यात साक्ष झाली आहे. हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे असे पत्र मुंबई उच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान मुंबई ट्रायल कोर्टाला दिले आहे.

राजकीय कारकीर्द व अस्तित्व धोका बनलेल्या कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा 2005 मध्ये माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचला व 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केली असा ठपका ठेवला आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे संशयीत आरोपी आहेत, हे सर्व आरोपी जामीनावर आहेत.

दुहेरी खुन खटल्याची 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे. 3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे येत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावतीने ऍड भुषण महाडिक हे बाजू मांडत आहेत तर इतर 8 आरोपींच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत.

सीबीआयच्या दोषारोप पत्रानुसार पारसमल जैन, सतीश मंदाडे हे डॉ पाटील यांच्या घरी गेले, मंदाडे याने जैन याची डॉ पाटील यांच्याशी ओळख करून दिली व सांगितले की, पवनराजे यांच्या हत्येची सुपारी यांना देण्यात आली आहे. मंदाडे याने संपवण्याचे तपशील व कारणे जैन याला सांगितली. हत्या केल्यानंतर 15 दिवसांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे दोघे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरी गेले व तिथून त्यांच्याकडून पैसे घेऊन आले. शुक्ला याने 25 लाख जैन याला दिले. त्यातील 5 लाख रुपये राजस्थान येथील घरी ठेवून 20 लाख घेऊन जैन उत्तर प्रदेशला गेला, तिथे 20 लाख कैलाश यादव याला दिले. त्याने 5 लाख स्वतःला ठेवून 15 लाख छोटे पांडे यांच्याकडे दिले. 15 लाख पैकी 7 लाख पांडे याने स्वतःला ठेवले व उर्वरित 8 लाख पैकी प्रत्येकी 4 लाख तिवारी व पिंटू सिंग याला दिले. अश्या प्रकारे आरोपीनी 25 लाखांच्या सुपारीची ‘वाटणी’ केली. 

Tags: #ajitpawar#arguement#arrest#ashokchavan#cbi#cm#court#courttrial#crime#dharashiv#drpadamsinhpatil#investigation#jayantpatil#maharashtra#Maharashtrapolice#murder#ncp#OmrajeNimbalkar#osmanabad#osmanabadnews#pawanrajemurder#police#rakeshmariya#sharadpawar#shivsena#उस्मानाबाद#ओमराजे#ओमराजे निंबाळकर#ओमराजेनिंबाळकर#डॉपद्मसिंहपाटील#तुळजापूर#देवेंद्रफडणवीस#धाराशिव
Previous Post

खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी तिकीट दर – छावा संघटना आक्रमक, तक्रार देत कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा 

Next Post

अतिवृष्टीचा तडाखा – भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली नुकसानीची पाहणी

Related Posts

महाराष्ट्र

घरावर छापा – जिल्हाधिकारी पाठकांना लाल दिवा ते कोठडीची हवा – ‘ते’ 3 जण संपर्काबाहेर, मालमत्ता शोध, 6 संचिका गहाळ

May 10, 2026
महाराष्ट्र

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

May 10, 2026
महाराष्ट्र

काव्य गौरव ग्रंथ – महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, रसिकांच्या भेटीला, 156 कविता

May 9, 2026
महाराष्ट्र

24 लाखांची नुकसान भरपाई – मोटार अपघातातील मृताच्या वारसांना दिलासा, ॲड एम बी माढेकर व सहकाऱ्यांचा यशस्वी प्रयत्न

May 9, 2026
महाराष्ट्र

अपघात – शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू, BLO चे कामकाज करून येताना काळाचा घाला

May 9, 2026
महाराष्ट्र

2020 पिक विमा प्रकरण : सरकारची कंपनी धार्जिन भुमिका, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान – आमदार कैलास पाटील

May 9, 2026
Next Post

अतिवृष्टीचा तडाखा - भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली नुकसानीची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

घरावर छापा – जिल्हाधिकारी पाठकांना लाल दिवा ते कोठडीची हवा – ‘ते’ 3 जण संपर्काबाहेर, मालमत्ता शोध, 6 संचिका गहाळ

May 10, 2026

हशीश ऑइल, आंतरराज्य टोळी – ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातुन एकाला अटक – धाराशिव पोलिसांची कारवाई

May 10, 2026

काव्य गौरव ग्रंथ – महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार, रसिकांच्या भेटीला, 156 कविता

May 9, 2026
May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp