धाराशिव – समय सारथी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फुटणार, राजकीय भूकंप होऊन काही खासदार व आमदार शिंदे गटात जाणार असल्याचे दावे केले जात असतानाच पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सुचक वक्तव्य केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भविष्यामध्ये तुम्ही बघा, पुढे पुढे काय होतयं. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा काही बदल झाला तर आपणाला वेगळं वावग वाटायला नको असे पालकमंत्री म्हणाले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे शिवसेना शिंदे गटाच्या गळाला लागले असल्याची चर्चा सुरु झाली. आम्हा दोघांची ठाकरे कुटुंबावर निष्ठा असुन कोणत्याही स्तिथीत पक्ष सोडणार नसुन संघर्ष करणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचं बरोबर तेचं अस्वस्थ असुन अस्वस्थतेतुन काय भूकंप होईल हे येणारा काळ दाखवून देईल असे म्हणाले. राजकीय डावपेच काही असले तरी ते येणार, आले तर आपले कसे या चर्चेने अनेक जण धस्तावले तर जे उड्या घेण्याच्या तयारीत चुळबुळ करीत होते ते शांत झाले.
भविष्यामध्ये तुम्ही बघा, पुढे पुढे काय होतयं. स्व बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने खरी खरी शिवसेना कोण आहे व ती कोणाची आहे हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब यांचे विचार कोण पुढे घेऊन चालले आहे त्यामाध्यमातून 80 जागा लढवून 60 जागा लढवुन आणण्याची किमया एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने केली आहे. खरी शिवसेना व धनुष्यबाण हे जनतेने मान्य करीत दाखवुन दिले आहे. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा काही बदल झाला तर आपणाला वेगळं वावग वाटायला नको असे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणात पालकमंत्री सरनाईक यांनी खासदार, आमदार यांना दिलेला मानसन्मान , जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमेकांशी मनसोक्त केलेला संवाद आणि त्यानंतर पालकमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याने खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याची चर्चा जोर धरु लागली. मात्र या बाबीवर आमदार कैलास पाटील यांनी भुमिका स्पष्ट केली.
शिवसेनेत 2022 ला बंड होत सत्तातरण झाले,त्यावेळी मी जीवावर उदार होत वाटेतुन परत आलो ते काही यांच्यासोबत परत जाण्यासाठी आलेलो नाही. माझी निष्ठा त्यावेळी आज, उद्या व कायम उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. धाराशिव जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांना मानणारा आहे, इथल्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. 2 वेळेस उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे, शिवसैनिकांच्या बळावर व मातोश्रीच्या विश्वासावर आम्ही निवडुन आलो आहोत, ही जाण आम्हाला आहे. आम्ही त्याला तडा जाऊ देणार नाही. आम्ही संघर्ष करु. सत्ता नसली म्हणुन आम्ही पक्ष बदलणार नाही. संघर्ष करुन लोकहोताची कामे करू मात्र पक्ष सोडणार नाही. सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा विषय आला तो बाजूला सारण्यासाठी ते तसे बोलत असावेत. सत्ता स्थापन झाल्यापासुन कोण असवस्थ आहे, हे त्यांची देहबोली व चेहरे पाहून कळेल. त्यांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत जाईल, ठाकरे यांच्या सोबतचा एकही आमदार फुटणार नाही असे आमदार कैलास पाटील म्हणाले.
पक्ष वेगळा विषय आहे, ती जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होती. पालकमंत्री सरनाईक यांनी सुरुवातीलाच सांगितले की, आमचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी यांना एकत्र घेऊन काम करू. त्यांनी सकारात्मक भुमिका मांडली व सुरुवात केली. विकासाच्या मुद्यावर आम्ही त्यांच्या सोबत राहू, त्यांनी काही चुकीचे काम केले, निर्णय घेतला तर त्यांना विरोधही करू. आम्ही आमच्या आमच्या पक्षात ठाम आहोत. राजकीय अर्थ लावू नये, तुमची इच्छा आहे का आम्ही तिथे भांडणे करावीत असा प्रतिप्रश्न केला. विकासासाठी एकत्र चुकले की विरोध असणार आहे.