Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

डॉ पद्मसिंह पाटील यांचा युक्तिवाद संपला – पवनराजे दुहेरी हत्याकांडात सुनावणीला गती, 30 जानेवारीपर्यंत इतर आरोपी मांडणार बाजु

समय सारथी by समय सारथी
March 4, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.9k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी दुहेरी हत्याकांडात मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात अंतीम युक्तिवाद केला. तोंडी युक्तिवाद नंतर डॉ पाटील यांचे वकील त्यांचे लेखी म्हणणे सादर करणार असल्याची माहिती आहे. डॉ पाटील यांनी हत्या केली नसुन त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद सादर केला. लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर अधिकची बाजु कळनार आहे. डॉ पाटील यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आरोपी मंदाडे, शुक्ला व कुलकर्णी यांच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडण्यास सुरुवात केली आहे. 30 जानेवारी पर्यंत हा युक्तिवाद पुर्ण होऊ शकतो. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे. या हत्याकांडातील 2 आरोपी शुटर पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे जेलमध्ये असुन इतर जामीनावर आहेत. 

राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह 9 जण या रक्तरंजित हत्याकांडात आरोपी असुन त्यात डॉ पाटील यांना सीबीआयने हत्या, कट रचणे यात मुख्य आरोपी केले आहे, आनंदीदेवी राजेनिंबाळकर ह्या फिर्यादी आहेत. पारसमल जैन या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला झाला असुन समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. डॉ पाटील यांच्या वतीने 20 साक्षीदार तपासण्यासाठी यादी दिली होती मात्र कोर्टाने आदेशाने 2 साक्षीदार तपासले. सरकारी व आरोपी पक्षाचे साक्ष, पुरावे संपले असुन हे प्रकरण अंतीम टप्प्यात आहे. डॉ पाटील हे प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत अनेक वेळा सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली, त्यावर आक्षेप घेत लवकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार देखील ठोठवावे लागले, तेव्हा याला गती आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी खासदार ओमराजे यांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तर जनआक्रोश मोर्चात पवनराजे हत्या प्रकरणी गेली 18 वर्षापासुन न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. 4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे, जी आता अंतीम टप्प्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 2013 मध्ये हा खटला अलीबागवरून मुंबई सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.  

3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने  येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 

मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांच्या टीमला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की जैनने मोठे काम केले आहे. 25 फेब्रुवारी 2009 ला एकेकाळी सोने व्यापारी व अनेक दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या जैनला अटक करण्यात आली, त्याने कबुली दिली. त्यानंतर डॉ पदमसिंह पाटील यांना पवनराजे हत्याकांड प्रकरणी सीबीआयने अटक केली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी मुंबई येथून सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांनी डॉ पाटील यांना अटक केली, त्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. डॉ पाटील यांच्या धाराशिव व मुंबई येथील घरावर सीबीआयने छापेमारी केली त्यात शस्त्रसाठा व अनेक आक्षेपहार्य बाबी सापडल्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते प्रफुल्ल पटेल व डी पी त्रिपाठी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने डॉ पाटील यांच्यासह 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट कोर्टात सादर केले त्यात पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपका ठेवला. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला,उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव,माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी,लातूर येथील सतीश मंदाडे,पारसमल जैन,शुटर दिनेश तिवारी,पिंटू सिंग व छोटू पांडे हे संशयीत आरोपी आहेत. आरोपी पारसमल जैन तुरुंगात असताना त्याची मुलगी वर्षा भेटायला गेली, वडिलांनी सांगितल्या प्रमाणे तिने सीबीआयच्या अधिकार्‍यांना 27 एप्रिल 2009 रोजी एक लेखी पत्र लिहून त्यात पवनराजे हत्याकांडाचा खुलासा केला. त्यानंतर जैन याने न्यायालयात दिलेल्या जबाबात माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे मार्फत पवनराजे व समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. हजारे यांनी त्यानंतर डॉ पाटील यांच्यासह 4 जणा विरोधात तक्रार देत हत्येची सुपारी दिल्याचा व कट रचल्याचा स्वतंत्र गुन्हा लातुर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केला. पारसमल जैन याने 25 सप्टेंबर 2009 रोजी न्यायाधीश एस बी महाले यांच्या कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिला, त्याच आधारावर डॉ पाटील यांना अटक करण्यात आली. 

माझी आर्थिक स्तिथी बिकट असल्याने स्तिथी मी माझा मित्र मोहन शुक्ला यांना सांगितली. जानेवारीमध्ये मी शुक्ला याच्या घरी गेलो त्यावेळी त्याने मला 50 हजार रुपयांची मदत केली व म्हणाला पारस कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. तू एक काम कर मेरे मित्र सतीश मंदाडे के पास लातूर जाकर उनसे मिल. उनका एक काम है, डॉ पदमसिंह पाटील पवनराजे निंबाळकर से परेशान है.उनकी हत्या का काम तू कर दे तो तुझे अच्छा खासा पैसा मिल जायेगा.मंदाडेने बताया डॉक्टर पदमसिंह पाटील साखर घोटाले के कारण बहोत परेशान है. इसलिये पहले पवनराजे का खून करने का उसके बादमे अण्णा हजारे का खून का काम भी तुम्हे दे देंगे.तो मैने उनको कहा कि मै पवनराजे साहब का काम कर दूंगा लेकिन अण्णा हजारे का काम नहीं कर पाऊंगा.तो मंदाडे ने काही ठीक है पवनराजे का करो. तो मैने पवनराजे को मारा. 

2004 साली पवनराजे यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवारी लढवली होती, त्यात डॉ पाटील हे अवघ्या 484 मतांनी विजयी झाले, त्यावेळी “पवनराजे यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा” अशी बातमी ऐन मतदानाच्या दिवशी एका वृत्तपत्रात प्रकाशित करुन त्याचे अंक वाटप करण्यात आल्याने संभ्रम व गोंधळ उडाला होता. विधानसभा निकालानंतर तेरणा ट्रस्ट व तेरणा साखर घोटाळा आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते, पवनराजे यांनी तेरणा ट्रस्ट मालकी बाबत कोर्टात प्रकरण दाखल केले. 2006 साली पवनराजे निंबाळकर यांचा खुन झाला, त्यांच्या हत्यानंतर 13 व्या दिवशी तक्रारदार हयात नसल्याचे कारण देत हे प्रकरण कोर्टात बंद करण्यात आले. अण्णा हजारे यांनी डॉ पाटील यांच्यावर साखर घोटाळा व इतर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यात डॉ पाटील हे न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाच्या चौकशीत दोषी सापडल्याने त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 2014 साली अण्णा हजारे यांनी त्यांच्या टीमसह येत धाराशिव लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात मतदार जागृती अभियान राबविले. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु आहे. 2009 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. डॉ पद्मसिंह पाटील व शुक्ला हे वेगवेगळी कारणे देऊन सुनावणीस गैरहजर राहत हजेरी माफिचा अर्ज देत आहेत तर मंदाडे याच्या विरोधात कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे मात्र तो गेली दीड वर्षापासुन पोलिसांना सापडेना झाला आहे. अण्णा हजारे हत्या सुपारी प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2025 रोजी लातुर येथील कोर्टात होणार आहे. ऍड मोहन जाधव हे तिघांच्या वतीने कोर्टात वकील आहेत. डॉ पाटील, शुक्ला व मंदाडे हे तिघेही पवनराजे हत्याकांडात आरोपी असुन त्याचं गुन्ह्यात हे प्रकरण उघड झाले होते, गुन्हा नोंद झाल्यापासुन या प्रकरणाला 15 वर्ष झाली आहेत.

Tags: #bjpleader#contractkillng#drpadamsinhpatil#murder#omrajenimbalakr#pawanrajemurder#politicalmurder#politics#shivsena#ओमराजे निंबाळकर#डॉपद्मसिंहपाटील
Previous Post

आत्महत्या प्रकरण – उच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली, आरोपी सुरेश कांबळे फरार, पोलिसांचा शोध सुरूच

Next Post

भेट – धाराशिव जिल्ह्यासाठी 50 नवीन बसेसची पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची घोषणा 

Related Posts

महाराष्ट्र

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

June 5, 2025
महाराष्ट्र

विकास व टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्याने पोटशूळ ?

June 4, 2025
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार – पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह, मुंबई व सोलापूरसह अन्य आरोपीना अभय

June 4, 2025
महाराष्ट्र

दोन हाणा पण मंत्री म्हणा – खासदार ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका 

June 4, 2025
महाराष्ट्र

तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार चितळेचा मोतीचुर लाडू – प्रसादाबाबत मोठा निर्णय, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

June 3, 2025
महाराष्ट्र

टेक्निकल टेक्स्टाईल पार्क – कौडगाव येथे कामांचा शुभारंभ, जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स – आमदार राणाजगजितसिंह पाटील

June 3, 2025
Next Post

भेट - धाराशिव जिल्ह्यासाठी 50 नवीन बसेसची पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची घोषणा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मुंबई,सोलापुरसह अन्य आरोपीना अभय – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर दबाव ? प्रश्नचिन्ह, शोधनिबंध

June 5, 2025

विकास व टेक्निकल टेक्सटाईलचे काम सुरू झाल्याने पोटशूळ ?

June 4, 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार – पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह, मुंबई व सोलापूरसह अन्य आरोपीना अभय

June 4, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp