धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणीची बैठक बुधवारी, 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्वस्तिक मंगल कार्यालय, बार्शी नाका, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणी बैठकीस भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणूक लढलेले उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विविध आघाड्या, प्रकोष्ट, मोर्चे जिल्हा, तालुकाध्यक्ष, महामंत्री, तालुका पदाधिकारी, विद्यमान नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, सरपंच, चेअरमन, सहकारी बँकेचे संचालक, शिक्षण संस्था संचालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. संताजीराव चालुक्य पाटील यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय अधिवेशनात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे प्रमुख मार्गदर्शक असून तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे अधिवेशन आणि विस्तारित कार्यकारिणीची बैठक महत्त्वपूर्ण आहे.
धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आजी – माजी पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणूक लढलेले उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विविध आघाड्या, प्रकोष्ट, मोर्चे जिल्हा, तालुकाध्यक्ष, महामंत्री, तालुका पदाधिकारी, विद्यमान नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, सरपंच, चेअरमन, सहकारी बँकेचे संचालक, शिक्षण संस्था संचालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांनी केले आहे.