धाराशिव – समय सारथी
महायुती सरकार विरोधात धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने चिखलफेक आंदोलन करुन घोषणाबाजी करीत निषेध केला. केंद्रातील सरकार महाभ्रष्ट असल्याचा आरोप करीत निषेध केला. नीट परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजेत, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला त्याचं बरोबर पीक कर्ज माफ झाले पाहिजे यासह अन्य मागण्या यावेळी कार्यकर्ते यांनी केल्या. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, उमेश राजे निंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, खलील सय्यद, प्रभाकर लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.