Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

समय सारथी by समय सारथी
November 8, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
224
VIEWS

धाराशिव, लातुर व सोलापूर या 3 जिल्ह्यातुन 2 वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस – सुनावणी

पालकमंत्री सरनाईकांचा हस्तक्षेपास नकार – ड्रग्ज, कला केंद्रनंतर गुन्हेगारांसाठी ठोस भुमिका

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूरचे दबंग नेते अशी ओळख असलेल्या देवानंद साहेबराव रोचकरी व त्यांचे पुत्र शिवसेना युवासेनेचे तुळजापूर संपर्क प्रमुख गणेश रोचकरी यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठवला असुन या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील यांनी उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे या पिता पुत्राच्या गुन्ह्याची यादी जोडत लेखी अहवाल पाठवला आहे. रोचकरी यांना धाराशिव, लातुर व सोलापूर अश्या 3 जिल्ह्यातुन 2 वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस केली आहे. रोचकरी यांना एका गुन्ह्यात शिक्षा झाली असुन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अपिलात आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

तुळजापूर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी देवानंद रोचकरी यांच्यावर 1984 पासुन गेल्या 42 वर्षात दाखल 37 गुन्ह्याची तर गणेश रोचकरी याच्यावर 2012 पासुन दाखल 9 गुन्ह्यांची यादी देत प्रस्ताव पाठवला आहे. देवानंद रोचकरी यांच्यावर गंभीर मारहाण, सरकारी नौकरास मारहाण, फसवणूकीचे असे  37 गुन्हे नोंद असुन त्यातील 29 गुन्ह्यात त्यांना कोर्टाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले आहे, 5 गुन्ह्यात त्यांनी फिर्यादीसोबत तडजोड केली असुन 3 गुन्हे न्यायालयात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत. 

गणेश रोचकरी याच्यावर 9 गुन्हे नोंद असुन त्यात खुनाचा प्रयत्न करणेसह शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद आहेत त्यातील 6 गुन्ह्यात कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असुन 2 कोर्टात प्रलंबित आहेत तर 1 गुन्हा पोलिस तपासावर आहे. या दोघांवर अनेकदा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (अ) (ब) प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे.  

पोलिसांनी गुन्ह्यांची फेरीस्त अहवालासोबत पाठवली असुन त्यात काही साक्षीदार यांचे गोपनीय जबाब आहेत. कायदा सुव्यवस्था हा मुद्दा पुढे करीत पोलिसांनी पिता पुत्राचा हद्दपारीचा अहवाल दिला आहे. देवानंद रोचकरी यांच्यावर तुळजाभवानी मातेचे मंकावती तीर्थकुंड बोगस कागदपत्रे तयार करून हडप केल्याचा कट रचल्याचा गुन्हा नोंद असुन यासह अन्य गुन्ह्यात त्यांना अटक झाल्यावर 2 महिने जेलवारी सुद्धा झाली आहे, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण,तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे मात्र त्यावर रोचकरी यांनी मालकीचा दावा करीत ताबा घेतला होता. गणेश रोचकरीवरील 9 पैकी 6 गुन्हे हे 307 जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आहेत.

देवानंद रोचकरी यांच्यावर 307 सह  हाणामारीचे विविध 31 गुन्हे नोंद आहेत, सरकारी नौकरास मारहाणीचे 4, फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. हद्दपारीचा प्रस्ताव असलेले रोचकरी पिता पुत्र हे गुंडगिरी वृत्तीचे व खुनशी असल्याने बऱ्याच गुन्ह्यात साक्षीदार आणि फिर्यादी हे भीतीने न्यायालयात साक्ष देऊ शकले नाहीत, भितीमुळे गुन्हे तडजोड झाल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात नमुद आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करून वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा झालीच नाही शिवाय गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. तुळजापूर व परिसरात दहशत निर्माण झाल्याने सार्वजनिक जीवितास व मालमत्तेच्या संरक्षणाची भिती निर्माण झाली आहे. शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 2 वर्षाच्या हद्दपारीचा प्रस्ताव दिला आहे.

हद्दपारीच्या प्रस्तावावर म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांनी रोचकरी पिता पुत्रांना नोटीस बजावत संधी देण्यात आली होती, त्यात त्यांनी काही गुन्हे हे खोटे व राजकीय द्वेषातुन दाखल झाल्याचे म्हणटले आहे. मुलगी सीमा माडजे ही जिल्हा परिषद सदस्य व मुलगा कृष्णा हे पंचायत समितीमध्ये निवडुन आल्याने राजकीय द्वेषापोटी खोटे निवेदन दिल्याचा तसेच नोटीस बेकायदेशीर, वस्तुस्तिथी विसंगत असल्याचा, मुलांचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने नोटीस दिल्याचा बचाव घेतला मात्र पोलिसांनी तो अमान्य करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला.

रोचकारी यांची कन्या व मुलगा हे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य म्हणुन उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीकडुन निवडुन आले आहेत, देवानंद यांनी अनेकदा विधानसभा विविध पक्षाकडून लढवली आहे. देवानंद व गणेश रोचकरी हे सध्या सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आहेत. पालकमंत्री सरनाईक यांच्यासोबत त्यांचा वावर गृहभेटी व अनेक कार्यक्रमातून अधोरेखित असतो. हद्दपारीच्या प्रकरणात दिलासा मिळण्यासाठी पालकमंत्री यांनी हस्तक्षेप करावा अशी गळ रोचकरी यांनी घालत मुंबईवारी केल्याचे कळते मात्र त्यांनी नकार दिल्याचे कळते. ड्रग्ज, कला केंद्र मुक्त धाराशिवनंतर गुन्हेगार व प्रवृत्तीसाठी सरनाईकांनी ठोस भुमिका घेतली आहे. कळंब ड्रग्ज तस्करीत त्यांनी कडक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.

Previous Post

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

Related Posts

महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026
महाराष्ट्र

अमानुष मारहाण, प्रेमप्रकरणाचा संशय – एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी, तुळजापूर येथील घटना

November 4, 2026
महाराष्ट्र

भुमिका, ड्रग्ज तस्करी – ‘दादा’गिरी, जामीनीनंतर जल्लोष – कडक कारवाईचे पालकमंत्री सरनाईकांचे आदेश

November 3, 2026
महाराष्ट्र

अभिष्टचिंतन.. सरपंच बिक्कड यांना मल्हार पाटीलांनी दिल्या केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा

November 3, 2026
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी दिवाळी निमित्त मोफत शिधा वाटप – लोकसभा सह संपर्क प्रमुख सुरज साळुंके

November 2, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी – जामीन मिळाल्यानंतर नगरसेवक मिर्झाचे जल्लोषात स्वागत

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

November 8, 2026

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026

अमानुष मारहाण, प्रेमप्रकरणाचा संशय – एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी, तुळजापूर येथील घटना

November 4, 2026
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp