धाराशिव – समय सारथी
कायद्याचे ज्ञान व धडे देणाऱ्या धाराशिव शहरातील नामांकित डॉ बापुजी साळुंके विधी महाविद्यालयात 2 विद्यार्थीना घुसून मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असुन या प्रकरणी प्राचार्यानी आंनद नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दिली आहे. क्लासमध्ये घुसून करण्यात आलेल्या मारहाण विरोधात विद्यार्थीनी आंदोलनाचा पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले.
हजेरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका महिला विदयार्थीनीच्या पती व नातेवाईक यांनी कॉलेजमध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. प्राचार्य यांच्या केबिनबाहेर विद्यार्थी यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली असुन कारवाईची मागणी केली. शाळा, कॉलेजमध्ये लिंग व जातीयवाद करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजमध्ये दबंगगिरी करण्यात आल्याने शिक्षक व विद्यार्थी यात नाराजीचा सुर आहे. दरम्यान कॉलेज ठोस कारवाईच्या पवित्र्यात आहे.

प्राचार्य डॉ कायला कृष्णमूर्ती यांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता विद्यार्थिनी शेख चांद सुलताना हिचे पती आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती महाविद्यालयाच्या परिसरात परवानगीशिवाय आले व त्यांनी बीए एलएलबीचे विद्यार्थी सुरज सुहास काशीद आणि प्रबुद्ध विनोद गायकवाड यांना मारहाण केली. हे विद्यार्थी वकीलीच्या शालेय युनिफॉर्मवर असताना त्यांना मारत पहिल्या मजल्यावरून खाली आणण्यात आले.

घटनेवेळी महाविद्यालयातील अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती वाद रोखला गेला. 2 विद्यार्थीयांचे फोटो घेऊन ते महाविद्यालयातून बाहेर पडल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थीनीवर कारवाई करून मारहाण करणाऱ्या संबंधितावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यासाठी विद्यार्थी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.












